
भारतातील आरोपीच्या घरातील बोगदा निघायचा दुसऱ्या देशात…
कोलकाता : पोलिस एका चोराला पकडण्यासाठी गेले असताना त्याच्या घरामध्ये एक बोगदा सापडला. संबंधित बोगदा हा भारताच्या पलीकडे म्हणजेच बांगलादेशात निघाला आहे. हे प्रकरण दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील कुलतली येथील आहे. सद्दाम सरदार असे आरोपी तस्कराचे नाव आहे. बनावट सोन्याच्या मूर्तींची तस्करी करणाऱ्याच्या घरात बोगदा सापडल्याने पश्चिम बंगाल पोलिसांना धक्काच बसला आहे.
पोलिसांनी सांगितले की, काँक्रीट बोगद्याचे एक टोक आरोपी सद्दाम सरदारच्या घराच्या भूमिगत खोलीत उघडते तर दुसरं टोक एका कालव्याला जोडलेले आहे. पोलिसांनी सोमवारी सरदारला एका प्रकरणात अटक केली, ज्यामध्ये त्याने बनावट सोन्याच्या मूर्तीद्वारे नादिया जिल्ह्यातील एका व्यक्तीची 12 लाख रुपयांची फसवणूक केली होती. मात्र, जमावाने पोलिस पथकावर हल्ला केला आणि सरदारची सुटका केली. पोलिसांना घाबरवण्यासाठी हल्लेखोरांनी हवेत गोळीबारही केला होता.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
सरदार याच्या घराची झडती घेण्यासाठी मोठा ताफा संध्याकाळी गावात पोहोचला. त्यानंतर त्याच्या घरात बोगदा सापडला. या मार्गाने तो पळून गेला असावा, असा अंदाज आहे. तो बांगलादेशात पळून गेला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी सरदारची पत्नी आणि त्याच्या भावाच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.
बरुईपूर जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सद्दाम आणि त्याचा भाऊ सैरुल हे अनेक प्रकरणांमध्ये आरोपी आहेत. पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला तर त्यांना पळून जाता यावे यासाठी घरात बोगदा करण्यात आला होता. आरोपी खरेदीदारांना आमिष दाखवायचा की आमच्याकडे सोन्याच्या सळ्या आणि मूर्ती आहेत, ज्या मला स्वस्तात विकायच्या आहेत’. तो त्यांना सोन्याच्या बनावट वस्तू दाखवत असे. खरेदीदार यायचे तेव्हा सद्दाम त्यांना एका निर्जन ठिकाणी घेऊन जायचा आणि त्या व्यक्तीवर हल्ला करून त्याचा सर्व माल हिसकावून घ्यायचा.’
पोलिसकाका Video News: १९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
Fastag चा बदलला नियम; तर भरावा लागेल दुप्पट टोल…
Video: पत्नी गरोदर अन् नवरा सुमद्र किनारी मैत्रिणीसोबत; रंगेहात पकडले…
आईचा निर्दयीपणा! मुलाला लाथा बुक्क्यांनी मारहाण, छातीवर चावली; कारण…
मैत्रिणीच्या छळाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोट समोर…

