पुणे शहरातील पबकडून कंडोम अन् ओआरएसचे पाकीटाचे वाटप अन् पुढे…

पुणे: नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आल्याचा प्रकार मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबमध्ये घडला आहे. परंतु, सर्व स्तरातून टीका करण्यात आल्यानंतर ही पार्टी रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

31 डिसेंबरच्या आधी ग्राहक अधिकाधिक आपल्याकडे खेचण्यासाठी पब व्यवस्थापक विविध प्रकारच्या युक्ती लढवत असतात. त्याचपद्धतीने पुण्यातील स्पिरिट कॅफे या पबकडून कंडोम, ओआरएस आणि सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले होते. संबंधित प्रकार समोर येताच आणि पोलिसांची चौकशी सुरु होताच कंडोम वाटणं गुन्हा नाही. आम्ही सुरक्षेच्या नावाखाली हे सर्व करत आहोत. जनजागृती व्हावी यासाठी आम्ही कंडोम, सॅनिटरी पॅड्स वाटत आहे, असा दावा संबंधित पबकडून करण्यात आला होता. ही गोष्ट समोर आल्यानंतर सर्व स्तरातून टीका करण्यात आली, त्यानंतर आता ही पार्टी रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

युवकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाबसुद्धा नोंदवले गेले आहेत. कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा पब व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे. तर ही बाब समोर आल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. पुण्यातील मुंढवा येथील हाय स्पिरिटकडून नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या युवकांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे, असे तक्रारीच्या पत्रात लिहले आहे. अशा कृतींमुळे युवकांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे, असे पत्रात नमूद केले आहे.

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!