बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे खंडणीची मागणी…

मुंबईः बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. एल्विश यादव यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एल्विश यादव याला एक निनावी फोन आला. हा फोन वजिराबाद गावाजवळून आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. एका निनावी फोनद्वारे एल्विश यादवकडून एक कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. हा फोन नेमका कोणी केला? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. गुरुग्रामच्या सेक्टर 53 पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात 358 क्रमांकाचा गुन्हा दाखल केला आहे.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

दरम्यान, एल्विश यादव एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. बिग बॉस OTT 2 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून त्याने एन्ट्री घेतली होती. बिग बॉस OTT 2 चे टायटलही एल्विशने जिंकले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एल्विशची प्रसिद्धी आणि फॅन फॉलोईंग झपाट्याने वाढली आहे. त्याच्या फॅन्समध्ये त्याच्या ‘सिस्टीम’च्या चर्चा रंगल्या आहेत. आता एल्विश यादवला गाण्यांपासून ते अनेक चित्रपटांच्याही ऑफर्स येऊ लागल्या आहेत.

एल्विशने आपल्या यूट्यूब चॅनलवर कॉमेडी व्हिडीओ बनवून लोकांची मनं जिंकलीत. YouTube वर त्याचे अंदाजे 14.5 मिलियन सब्सक्रायबर आहेत. 29 एप्रिल 2016 रोजी एल्विशने YouTube च्या जगात आपले पाऊल ठेवलं. पण त्याच्या करिअरसाठी बिग बॉस OTT 2 चा विजेता बननं हा मोठा टर्निंग पॉईंट ठरला. एल्विश यादव त्याच्या लक्झरी लाईफमुळेही प्रसिद्ध आहे. त्याला महागड्या गाड्यांचाही खूप शौक आहे. यावर्षी एल्विश त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला गेला होता.

Video: ‘जेलर’ फेम अभिनेता विनायकनला अटक; कारण…

ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा…

आम्ही वेगळे झालोय! अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र याचे ट्विट…

अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार झाल्याचा आईचा आरोप…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!