भाजी विक्रेत्या युवकावर हल्लेखोरांनी दिवसा सपासप केले वार…

नाशिक : अंबड परिसरातील सिडको येथे शॉपिंग सेंटर जवळ शस्त्रधारी हल्लेखोरांनी भाजी विक्रेत्या युवकावर दिवसा ढवळ्या सपासप वार करून ठार केले. संदीप आठवले असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, मागील पंधरा दिवसात नाशिकमध्ये खुनाची चौथी घटना आहे.

भाजी विक्रेता संदीप आठवले याच्यावर चार ते सहा हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन आठवले याचा जागीच मृत्यू झाला. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. आठवले रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे बघून हल्लेखोर फरार झाले. अंबड पोलिस ठाण्याच्या पथकासह गुन्हे शाखा, इंदिरानगर, एमआयडीसी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी आठवले याचा मृतदेह रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविला. हल्लेखोरांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची दोन पथके तसेच अंबड गुन्हे शोध पथक रवाना करण्यात आले आहे. हल्लेखोरांना अटक करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी काही तासातच संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिसांनी अवघ्या तीन तासात या खूनाचा उलगडा करुन पाच आरोपींना ताब्यात घेतले असून तीन आरोपी अद्याप फरार आहे. हा खून जुन्या वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुख्य आरोपी ओम प्रकाश पवार उर्फ मोठा ओम्या खटकी याच्यासह ओम चौधरी उर्फ छोटा खटकी, साईनाथ गणेश मोरताटे उर्फ मॅग्गी मो-या, अनिल प्रजापती व पार्थ साठे यांना ताब्यात घेतले आहे. तर तीन आरोपींचा शोध सुरु आहे.

नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…

नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…

Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…

युवकांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला जगाचा निरोप; चिठ्ठीत म्हटले की…

Video : शाळेतच दोघींनी ओढल्या एकमेकींच्या झिंज्या…

पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!