
प्रेमात वेडा! बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने केली आत्महत्या; कारण…
सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद बर्गे (वय 35) या माजी उपसरपंचाने एका नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिला ताब्यात घेतले आहे.
सासुरे गावात बुधवारी सकाळी पूजा गायकवाड हिच्या घरासमोर एक गाडी उभी होती. गाडीच्या ड्रायव्हर सीटवर गोविंद बर्गे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले. त्यांनी स्वतःच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडून घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. गोविंद बर्गे आणि नर्तिका पूजा यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून ओळख होती. गोविंद बर्गे विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत.
गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, गोविंद बर्गे यांचे पूजावर प्रेम होते. त्यांनी पूजाला सोन्या-चांदीचे दागिने आणि 2 लाख रुपयांचा महागडा मोबाईल फोनही भेट दिला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि गोविंद यांच्यात संपर्क नव्हता. या कारणावरून गोविंद अस्वस्थ होते. पूजा त्यांच्या जवळ घर नावावर करण्यासाठी तगादा लावत होती. याच कारणामुळे गोविंद बार्शी तालुक्यातील सासुरे येथे पूजाच्या घरासमोर आले आणि त्यांनी स्वतःला संपवले. त्यांनी उजव्या कपाळावर गोळी झाडून घेतली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गोविंद बर्गे यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांची मुलगी नववीत शिकते. तर लहान मुलगा सहावीत शिकत आहे. गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी 21 वर्षांच्या नर्तिका पूजा गायकवाड हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी पूजा गायकवाड हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…
दोन लग्न झालेल्या महिलेचे माजी सरपंचासोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे…
बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…
पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…
Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…

