पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…

पुणे: पुणे शहरातील कोथरूडमध्ये गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री एका व्यक्तीवर गोळीबार झाला आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी केलेल्या या गोळीबारात प्रकाश धुमाळ (वय ३६) हे गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार झाला तेव्हा धुमाळ आपला जीव वाचवण्यासाठी धवात होते, त्यावेळी त्यांच्या अंगावरून पडणाऱ्या रक्ताने माखलेले पायाचे ठसे परिसरात उमटल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच नाना पेठेत टोळीयुद्धातून आयुष कोमकरची (वय १९) हत्या करण्यात आली होती. ही गोळीबाराची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरले आहे. मुसा शेख, रोहित आखाड आणि मयूर कुंभारे अशी गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींची नावे आहेत. तिघेही बुधवारी रात्री कोथरुड परिसरातून जात होते. यावेळी एका वाहनचालकाने घायवळ टोळीच्या गुंडाना पुढे जाण्यास साईड दिली नाही. याच कारणातून हे तिघे संतापले आणि त्यांनी कारमधील प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला. सुरुवातील तीन राऊंड फायर केल्याची माहिती मिळत होती. मात्र आता रात्री एकच राऊड फायरिंग केल्याचं सांगितले जात आहे. ही घटना कोथरूडच्या शिंदे चाळ परिसरात घडली. या गोळीबारात प्रकाश धुमाळ जखमी झाले असून, त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती रात्री मुठेश्वर मंदिरासमोर उभे होते. यावेळी दुचाकीला रस्ता दिला नाही या क्षुल्लक कारणावरुन घायवळ टोळीतील गुंडांकडून गोळीबार करण्यात आला. प्रकाश धुमाळ जीव वाचवण्यासाठी एका इमारतीच्या दिशेने धावली आणि एका पाण्याच्या टाकीवर चढून लपुन बसली. या दरम्यान या ठिकाणी राहणाऱ्या सचिन गोपाळघरे नावाच्या व्यक्तीने प्रकाश धुमाळ यांना पाणी दिले आणि मदत केली. या दरम्यान प्रकाश धुमाळ यांच्या शरिरातून वाहणारं रक्त या इमारतीच्या भोवताली पडलेलं होतं, पायाचे ठसे उमटलेले होते.

विशेष म्हणजे जिथे ही घटना घडली ते ठिकाण पोलिस स्टेशनपासून २०० मीटर अंतरावर आहे. हा गोळीबार निलेश घायवळ टोळीतील गुंडांकडून करण्यात आला आहे. या टोळीतील मयुर कुंभारे याने हा गोळीबार केला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याचे इतर साथीदार फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

आंदेकर X कोमकर! कृष्णा आंदेकर पोलिसांना आला शरण…

पुणे! निलेश घारेकडून स्वत:च्याच कारवर गोळीबाराचा डाव; कारण…

Video: पुणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली वरात…

पुणे जिल्ह्यात वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू…

पुणे शहरातील कात्रज घाटात गोळीबार; कारण समोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!