लेखक राजन खान यांच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांना अटक…

पुणे : लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबबातचा पुढील तपास करत आहेत.

डेबू खान याने २ ऑक्टोबर रोजी शिंदेवस्ती सोमाटणे येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डेबूच्या बहिणीने १७ ऑक्टोबर रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आता तळेगाव दाभाडे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. डेबूला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पांडुरंग सूर्यवंशी उर्फ देवा (रा. हडपसर, पुणे), प्रतीक जाधव (रा. भारती विद्यापीठ, पुणे), गणेश वाळुंज आणि आकाश बारणे उर्फ नन्या माऊली वडेवाले (दोघेही रा. कात्रज, पुणे) या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फिर्यादी यांचा भाऊ डेबू याने आरोपींना बचत गटाचे तसेच बँकेच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे दिले होते. आरोपींना दिलेले पैसे डेबू परत मागत होता. मात्र, आरोपींनी पैसे आम्हाला दिलेच नाहीत, असे म्हणून टाळाटाळ केली. तसेच, न वटणारे धनादेश देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली. आरोपींनी वारंवार दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून डेबू याने २ ऑक्‍टोबर रोजी शिंदे वस्ती, सोमाटणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पुढील तपास करत आहोत.’

लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहीले की…

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पुणे स्टेशनवर मोबाईल चोरणारा आला अन् सापळ्यात अडकला…

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!