पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!

मुंबईः पाकिस्तानमधून सहिसलामत परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानने तब्बल ३ महिने २१ दिवस त्यांचा छळ केला होता. भारत सरकारने मोठे प्रयत्न केल्यानंतर त्यांची सुटका झाली होती. संपूर्ण देशाने त्यांच्या सुटकेनंतर आनंदोत्सव साजरा केला होता. चंदू चव्हाण सध्या लष्करात पठाण कोट येथे लष्करात सेवा बजावत आहेत. पण, सध्या त्यांना आर्थिक संकटाचा मोठा सामना करावा लागत आहे.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

चंदू चव्हाण यांनी सांगितले की, ‘संदिप बापू माळे, (वय ३०, रा. उंबरखेड, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक) व निलेश बहिरे (रा. मखमला बाद, नाशिक) यांनी शेअर मार्केटच्या खाली माझ्यासह अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारी त्यांची मोठी टोळी आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला सांगितले. शिवाय, दर महिन्याला चांगला मोबदला असल्याचे आश्वासन दिले. त्यांच्या गोड-गोड बोलण्यावर विश्वास ठेवला. चार लाख रुपयांचे कर्ज काढले आणि रक्कम गुंतवली. रक्कम गुंतवत असताना विश्वास तर संपादन केलाच शिवाय नोटरी केल्यामुळे विश्वास वाढला. शेअर मार्केटच्या नावाखाली पैसे गुंतवल्यानंतर काही दिवस प्रत्येक महिन्याला रक्कम देऊ लागला. पण, पुढे पैसे देणे बंद केले. थोडक्यात, माझ्याकडील पैशांमधूनच थोडी रक्कम मला दिली आणि पुढील रक्कम त्याने गिळंकृत केली आहे.’

sandeep-male-nilesh-bahire
शेअर मार्केटच्या नावाखाली ही मोठी टोळी असून, गोड बोलून अनेकांची फसवणूक करत आहे. माझ्यासह अनेकांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या सांदिप माळे व निलेश बहिरे हे दोघेही फरार असून, संपर्क होत नाही. माझ्यासह लष्करातील अनेक जवान व पोलिसांना त्यांनी फसवले आहे. लष्करातून सुट्टीवर आल्यावर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. शिवाय, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवदेन देणार आहे. पण, माझ्या सारखी फसवणूक होऊ नये म्हणून तुम्ही सावधानता बाळगा. शिवाय, संदिप बापू माळे व निलेश पाटील (मखमला बाद नाशिक )हे कुठे दिसल्यास पोलिसांना कळवा, असे आवाहान चंदू चव्हाण यांनी केले आहे.

पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक…

जवान चंदू चव्हाण यांना धुळे महानगर पालिकेत धक्काबुक्की…

जवानाने ‘माणूस मरतो पण आत्मा अमर आहे’ असा स्टेटस ठेवला अन्…

जवान संदीप मोहिते अनंतात विलीन; काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश…

काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!