
पुणे शहरातील ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणारी टोळी १२ तासात जेरबंद; पाहा नावे…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला १२ तासाच्या आत गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
शनिवारी (ता. १८) दुपारी १२.१० वा. चे सुमारास BJS ज्वेलर्स नावाचे मॅजेस्टिक मेमरीज सोसायटी तळमजला महमंदवाडी पुणे येथे गाळा नं.५३ येथे सोन्या चांदीच्या दुकानावर ५/६ दरोडेखोरांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने रिव्हॉल्वर, लोखंडी रॉड व स्प्रे याचा धाक दाखवून दुकानातील अंदाजे ३०० ग्रॅम वजनाचे तयार सोन्याचे दागीने चोरी करुन पळून गेले होते. त्याप्रमाणे गुन्हा वानवडी पोलिस ठाणे गुन्हा रजि. नंबर ३५०/२०२४ भादंविक ३९५, ३९७, ३९८, भारतीय हत्यार कायदा ३(२५) महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा झाला होता.
पोलिस आयुक्त यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलिस आयुक्त, गुन्हे पुणे शहर व पोलिस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर यांच्या सुचनेप्रमाणे व सहायक पोलिस आयुक्त गुन्हे १ व २ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील युनिट ४, ५, ६, खंडणी विरोधी पथक १ व २, दरोडा व वाहन चोरी पथक २ कडील अधिकारी व पोलिस अंमलदार यांची १० पथके तयार करून समांतर तपास करण्यास आदेशीत केले होते. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सदर तपासाचे दरम्यान मिळालेल्या गोपनीय बातमी दारांचे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा नमुद आरोपीनी केला असल्याच्या बातमीवरून आरोपी
१) सनी ऊर्फ योगेश हिरामण पवळे, वय २० वर्षे, रा. ए. आर.ए.आय. रोड, वसंतनगर, खडेकश्वर मित्र मंडळाजवळ, केळेवाडी, पौड रोड, कोथरुड, पुणे
२) सनी ऊर्फ आदित्य राजु गाडे, वय १९ वर्षे रा. सदर
३) पियुष कल्पेश केदारी, वय १८ वर्षे, रा. स.नं. १०३, जयप्रकाश नगर, माऊली चौक, डॉन बॉस्को हायस्कुल समोर, येरवडा, पुणे
४) ओमकार ऊर्फ ओम्या जगन वाल्हेकर, वय १९ वर्षे, रा. जयभवानीनगर, कोथरुड, पुणे
५) नारायण ऊर्फ नारु बाळु गवळी, वय २० वर्षे, रा. टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कोंढवा रोड, कात्रज, पुणे
६) मयुर चुन्नीलाल पटेल, वय ५३ वर्षे, रा. स.नं. १४, प्लॉट नं. ६, लोकरे बिल्डींग, फ्लॅट नं. १, कामधेनु पार्क शेजारी, वानवडी, पुणे
७) नासिर मेहमुद शेख, वय ३२ वर्षे, रा. घर नं. ३१६, चांभारवाडा, वानवडी, पुणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी इतर ०३ साथीदार यांच्या मदतीने महंमदवाडी येथील BJS ज्वेलर्स दुकानात जावुन दुकानात असलेल्या व्यक्तींना चाकु व रिव्हॉल्वरची भिती दाखवुन त्यांना मारहाण करुन त्यांचे दुकानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरुन आणलेले आहे असे सांगितले. त्यांच्याकडून ६०१.१५ ग्रॅम वजनाचे सोने, २ दुचाकी, १ चारचाकी व ६ मोबाईल असा एकूण ४८,३०,९१०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करून उत्तम कामगिरी केलेली आहे.
खालील नमुद ताब्यात घेतले आरोपीतांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
१) सनी ऊर्फ योगेश हिरामण पवळे – सिंहगड रोड पो ठाणे गुरनं ४६०/२०२२ भादवि ३०२ अन्वये
२) सनी ऊर्फ आदित्य राजु गाडे – सिंहगड रोड पो ठाणे गुरनं ४६०/२०२२ भादवि ३०२ कोथरूड पो ठाणे गुरनं ५९/२०२२ भादवि ३७९
३) मयुर चुन्नीलाल पटेल नारायणगाव पो ठाणे गुरनं ६८/२००१ भादवि ३०२, २०१, १२० (ब) व इतर
सदरची कारवाई पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त – २, गुन्हे सतीश गोवेकर, सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप खंडणी विरोधी पथक २, अजय वाघमारे, दरोडा व वाहनचोरी पथक २, उल्हास कदम, युनिट ६, क्रांतीकुमार पाटील, खंडणी विरोधी पथक १ यांचे सुचनेप्रमाणे सपोनि विजयकुमार शिंदे, सपोनि शिवदास लहाने, पोउनि अविनाश लोहोटे, पोउनि श्रीकांत चव्हाण, पोउनि यशवंत ओंबासे पोलिस अंमलदार अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, मयुर भोकरे, सयाजी चव्हाण, अशोक शेलार, अमोल सरतापे, चेतन शिरोळकर, राहूल इंगळे, विनायक येवले, सुरेद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, दिलीप गोरे, खरात, पवण भोसले, विनोद शिवले, अश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, दाऊद सय्यद, माऊली गिरमकर, सुदेश सपंकाळ, सुरेश जाधव, शिरीष गोसावी, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, राहूल ढमढेरे, अकबर शेख, प्रविण ढमाळ, शहाजी काळे, रविंद्र फुलपगारे, अमर पवार यांनी केली आहे.

पुणे शहरात दिवसाढवळ्या सराफ दुकानात सशस्त्र दरोडा…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरातील कंपनीमधील दरोड्यातील आरोपींना अटक; पाहा नावे…
पुणे शहरात दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीस युनिट ५ने केले जेरबंद…
पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथका १ ची धडाकेबाज कारवाई…
पुणे शहरात टोळक्याकडून कोयत्याने वार करत एकाचा निर्घृण खून…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

