अमरावती व्हिडीओकांड प्रकरणील आरोपीचा ‘गुरूमंत्र’ ठरलेला ‘आप वही हो ना?…

अमरावती : मेळघाटातील बीएससीचा विद्यार्थी ते अनेक मुलींच्या आयुष्याशी खेळणारा परतवाडा ‘व्हिडीओ कांड’चा मुख्य सूत्रधार असलेल्या अयान अहमद याच्या विकृतीचा रोज नव्याने पर्दाफाश होत आहे. ‘आप वही हो ना?’ या एका साध्या वाक्यातून संवादाच जाळ विणून मुलींना आपल्या जाळ्यात ओढणारा अयान अहमद सध्या पोलिस कोठडीत असून, त्याने दिलेली कबुली ऐकून एसआयटी चक्रावून गेली आहे.

एका कथित ‘गुरू’ने दिलेल्या ‘गुरुमंत्रा’चा वापर करून त्याने अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. अयान याने चौकशीत सांगितले की, दोन वर्षापूर्वी एका गुरूने त्याला संवादाचे कौशल्य शिकवले होते. ‘आप वही हो ना? अशा संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रश्नाने तो संवादाची सुरुवात करायचा. समोरची मुलगी ‘हो’ किंवा ‘नाही’ असे उत्तर न देता सविस्तर बोलायची आणि येथूनच अयानच्या जाळ्यात अडकण्याची प्रक्रिया सुरू व्हायची. आरोपी आयनला सोशल मिडीयावरती मोठ्या संख्येत फॉलोवर आहेत. इन्स्टाग्रामवर १८ हजार फॉलोअर्सचा वापर त्याने ‘हंटिंग ग्राउंड’ सारखा केला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका टू-बीएचके फ्लॅटमध्ये अयानने काही मुलींसोबत नको ते केले. अयानचा मित्र आणि अटकेत असलेला आरोपी मानव सुगंधे याने अयानला ५०० रुपये प्रतितास या दराने हा फ्लॅट उपलब्ध करून दिला होता. आता फ्लॅटमालक पोलिसांच्या रडारवर आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये परतवाड्याचे काही पोलिस मुख्य आरोपी अयान अहमद याचा वाढदिवस साजरा करताना दिसून येत होते. या बाबीचा गुन्ह्याच्या तपासावर प्रभाव पडू नये, यासाठी परतवाडा पोलिस ठाण्यातील तिघांना निलंबित करण्यात आले आहे.

आरोपी अयान अहमदचे जुने व्हिडीओ फोटो व्हायरल झाले आहे. गळ्यात MIM पक्षाचा रुमाल घालून दर्ग्यावर असतांनाचा फोटो तर एका दुसऱ्या व्हिडिओत MIMच्या उमेदवाराचा रिल बनवतांनाचा व्हिडीओ समोर आला आहे. अयान अहमद याला लहानपासून रिल बनवण्याचा शौक होता. वयाच्या 14-15 व्या वर्षांपासून त्याने सोशल मीडियावर रिल बनवणे सुरू केले. डायलॉग म्हणणे, गाण्यावर स्टाईलने चालणे असे अनेक व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर टाकले आहे. सोशल मीडियावर अतिशय ऍक्टिव्ह असल्यानेच त्याने अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यांना ब्लॅकमेल करून अनेक मुलींचे अश्लील व्हिडीओ बनवले.

अमरावती प्रकरण! कोण जास्त मुली पटवणार लागली पैज अन् फुटलं बिंग…

अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या मोबाईलमध्ये आढळले Video; सहा अटकेत…

अमरावतीच्या मोहम्मदला अटक, १८० तरुणींचे लैंगिक शोषण अन् ३५० Video…

अमरावतीत तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, आरोपीवर गुन्हा दाखल…

मुंबईत Live कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस, युवक-युवतीचा मृत्यू…

पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी…

प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…

महाराष्ट्र हादरला! डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून बनविले अश्लिल व्हिडिओ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!