
पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 45 हजार घरे उभारणार…
मुंबई : मुंबईतील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी सुमारे 45 हजार शासकीय निवासस्थान उपलब्ध करण्यासाठी ‘पोलिस हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मंजूर झाला असून, हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत राज्य पायाभूत सुविधा महामंडळाद्वारे उभारला जाणार आहे.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
या टाऊनशिपमध्ये सुमारे पाच कोटी चौरस फूट क्षेत्र विकसित केले जाणार असून त्यासाठी अंदाजे 20 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी 30 टक्के निधी शासन पुरवेल आणि उर्वरित 70 टक्के निधी विविध बँक आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होईल. मुंबईत वाढती लोकसंख्या लक्षात घेता सुरक्षा यंत्रणेची गरज आहे. पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी जवळच निवास करत असल्यास ते अधिक तत्परतेने आणि कार्यक्षमतेने आपले काम करू शकतील. मुंबई पोलिस दलात सध्या 51 हजार 308 कर्मचारी काम करतात, परंतु फक्त 22 हजार 904 निवासस्थान उपलब्ध आहेत. त्यापैकी 3 हजार 777 निवासस्थाने जीर्ण किंवा वापरण्यास अयोग्य आहेत.
सध्या दर महिन्याला चारशे ते पाचशेहून अधिक अधिकारी-कर्मचारी निवासस्थानांसाठी अर्ज करतात, पण जागा नाहीत. त्यामुळे पोलिसांना रोजच प्रवास करून कामावर यावे लागते. पोलिसांच्या कामाच्या स्वरूपानुसार कार्यालयाजवळ निवासस्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतंत्र टाऊनशिप उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई पोलिस दलातील शिपाई यांचा लष्करातील जवानांप्रमाणे होणार सन्मान…
गृह विभागाचा मोठा निर्णय, पोलिस हेड कॉन्स्टेबलही गुन्ह्यांचा तपास करणार…
पोलिस अधिकारी युद्धात सहभागी होऊ शकतात का? नियम घ्या जाणून…
मराठा आंदोलक! मुंबई पोलिसांनी घडवलं माणुसकीचं दर्शन…

