
खाकी वर्दीला सॅल्यूट! परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्याकडून माणुसकीच दर्शन…
जालना : पोलिसांच्या खाकी वर्दीत दडलेला असतो एक माणूस. अशाच एका माणुसकीच दर्शन जालना-परभणी रोडवर पाहायला मिळाले. परभणीच्या पोलीस अधीक्षकांची गाडी छ. संभाजीनगरवरून परभणीकडे जात असताना त्यांना भरउन्हात वृद्ध आजी काटी टेकवत टेकवत जात असल्याचे दिसले. त्यानंतर परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी आपली गाडी थांबवून त्या आजीबाईंना मदत करत रुग्णालयात पाठवले आहे.
परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी हे दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहुन शासकीय कामकाज आटोपून अंबड-घनसावंगी मार्गे परत परभणीकडे जात होते. अंबड शहरापासून काही अंतरावर असलेल्या घनसावंगी फाट्यावर त्यांना भर उन्हात एक 80 ते 90 वर्षे वयोगटातील वृद्ध आजी दिसली. आजीच्या पायातील चपलाही अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या, या वृद्ध आजीला वयोमानानुसार बोलताही येत नव्हते. चालत्या वाहनातून पोलीस अधीक्षक परदेशी यांची त्या नजर गेली आणि त्यांनी वाहन थांबवले. आजीला स्वतःजवळ असलेले पाणी पाजून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. झाडाखाली स्वतः हाताने आधार देत नेऊन बसवले. शिवाय, आजीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या चपला, काठी आणि पिशवी हातात घेऊन झाडाखाली नेऊन मदत केली. त्यानंतर, पोलीस अधीक्षक परदेशी यांनी अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांना मोबाईलवरून संपर्क करून त्या आजीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याच्या सूचना केल्या.
वरिष्ठ अधिकारी परदेशी यांच्या सूचनेवरुन बारवाल यांनी तातडीने पोलीस हवालदार विष्णू चव्हाण आणि स्वप्नील भिसे यांना घटनास्थळी शासकीय वाहनातून पाठविले. पोलिसांचे वाहन येईपर्यंत घटनास्थळी असलेल्या पोलीस अधीक्षक परदेशी यांनी वृद्ध आजीला पोलीस वाहनात बसवून दिले. त्यानंतर ते परभणीकडे रवाना झाले. परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्या माणुसकीचे दर्शन झाल्याने खाकी वर्दीतली माणूसकी पाहायला मिळाली. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल झाले असून, त्यांचे कौतुक होत आहे.
दरम्यान, वृद्ध आजीला अंबड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या आजी अंबड तालुक्यातील बेलगांव येथील असून, त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. सहसा पोलिसांवर सर्वसामान्य नागरिकांचा राग असतो, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील असा संवेदशीलपणा व माणुसकी पाहून अशा पोलिसांना नक्कीच सॅल्यूट करावा वाटतो.
नाशिक शहर पोलिस :
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!