पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर मंचर बायपासवर आज (शुक्रवार) सकाळी टेम्पो आणि क्रुझरमध्ये झालेल्या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. तीन जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर दोन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावर मंचर बायपासला हा भीषण अपघात झाला आहे. पुढे चाललेल्या टेम्पोला क्रुझर गाडीने पाठीमागच्या बाजूने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी तिघांवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर दोन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, रस्त्यावर पडलेल्या दाट धुक्यामुळे चालकाला अंदाज आला नसावा त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. पहाटे रस्त्यावर दाट धुकं होते, त्यामुळे रस्त्यावरील पुढची वाहने दिसत नव्हती. वेगाने जाणाऱ्या क्रूझर गाडीची मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक बसली आणि एकच गदारोळ उडाला. त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

भीषण अपघात! दोन सख्ख्या भावांसह पाच मित्रांचा जागीच मृत्यू…

Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

भिक्षुकाचा अपघाती मृत्यू, गोधडीत सापडले लाखो रुपये…

जबलपूरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; महाराष्ट्राच्या जवानाचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!