फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’

पुणे (संतोष धायबर): राज्यातील अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वयोमानानुसार सेवानिवृत्ती घ्यावी लागते. पोलिस दलात सेवेत असताना अनेकजण सतत चर्चेत असतात. पण, सेवानिवृत्तीनंतर अचानक मागे पडतात. सेवानिवृत्तीनंतर अनेकजण मिळालेला वेळचा सद्उपयोग करत असून, आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. ‘पोलिसकाका’च्या वतीने ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे.

राज्यातील पोलिस दलातील अनेक जण धडाकेबाज गुन्हा उघड करतात. पण, संबंधित गुन्ह्याला प्रसिद्धी मिळत नाही. www.policekaka.com ही वेबसाईट त्यासाठीच काम करत आहे. धडाकेबाज कामगिरी करूनही प्रकाशझोतात न आलेला गुन्हा, पोलिस दलात काम करत असताना आलेले विविध अनुभव, सामाजिक कामांची माहिती पुस्तकात घेतली जाणार आहे. शिवाय, सेवानिवृत्तीनंतर वेळ कसा घालवता? कुटुंबियांना वेळ कसा देता अथवा फिरणे असो व सेवेत असताना राहून गेलेली कामे करत असाल तर हे अनुभव ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ या पुस्तकात घेतले जाणार आहे. तुमच्या अनुभवांचा सेवानिवृत्तीच्या वाटेवर असणाऱ्यांनाही उपयोग तर होईलच. पण, सेवानिवृत्तीनंतरही पुस्तकाच्या माध्यमातून आपण कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहात.

सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्वअनुभावर हे सशुल्क पुस्तक असणार आहे. एक हजार शब्दांमध्ये लेख लिहून पाठविल्यास आमची संपादकीय टीम त्या लेखावर संस्कार करून लेख फायनल करणार आहे. पहिल्या २० लेखकांचे मिळून एक पुस्तक असणार आहे. पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान २० लेखकांचा सन्मान केला जाणार असून, पुरस्कार दिला जाणार आहे.

‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ या पुस्तकामध्ये आजच आपले स्थान निश्चित करा आणि लेख आणि सेवेत असताना आणि सेवानिवृत्तीनंतरची विविध छायाचित्रे आमच्यापर्यंत पोहचवा. प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला पुस्तकामध्ये प्रत्येकी दहा पाने दिली जाणार आहेत.

दरम्यान, पोलिसकाकाच्या वतीने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुलाखतींवर विविध पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून, एका पुस्तकाचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे.

लेख आणि छायाचित्रे पाठविण्यासाठी…
WhatsApp: 93712 69949
policekaka100@gmail.com

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

डिजिटल मीडियासाठी वाचनीय मजकूर आवश्यक : संतोष धायबर

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!