
अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी गेलेल्या युवतीची प्रियकराने केली हत्या…
सोलापूर : अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी गेलेल्या युवतीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी 10.30 ते 11.45 च्या सुमारास बासलेगाव रोडवरील एका घरात घडली आहे. युवतीवर वार केल्यानंतर संबंधित युवकाने स्वतःच्या गळ्यावरही धारदार शस्त्राने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, सध्या तो गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
स्नेहा श्रीकांत बनसोडे (वय 20, रा. रामवाडी, सोलापूर) असे मृत युवतीचे नाव आहे. आदित्य रमेश चव्हाण (रा. नागूरतांडा, ता. अक्कलकोट) असे आरोपी युवकाचे नाव आहे. अक्कलकोट येथील पिरजादे प्लॉटमधील एका घरात हे दोघे असताना हा थरार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
स्नेहा आणि आदित्य यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच आदित्यने धारदार हत्याराने स्नेहाच्या गळ्यावर वार करून तिला जागीच ठार केले. या घटनेनंतर त्याने स्वतःवरही वार करून घेतल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सध्या त्याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पोलिस निरीक्षणासाठी उपचार सुरू आहेत.

स्नेहाच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, तिच्या वडिलांचे 15 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तिची आई एका शाळेत शिपाई म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. आपल्या मुलीचा अशा प्रकारे अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आता या हत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, स्नेहाची आई रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बाहेरून घरी आली. त्यावेळी मुलगी स्नेहा घरात नव्हती. आईने दुसरी मुलगी प्रतिक्षाला बहिणीबद्दल विचारलं. तेव्हा स्नेहा नवीन वर्षानिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेल्याचे तिने सांगितले. त्यानंतर शेजारच्या मैत्रिणीकडून स्नेहाचा अक्कलकोटमध्ये घातपात झाल्याच समजले. त्यानंतर आई आणि नातेवाईक अक्कलकोटमधील सरकारी दवाखान्यात आले. स्नेहाच्या गळ्यावर धारदार तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने रक्तस्त्राव झाल्यानं उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुलीच्या आईचे माहेर मैंदर्गी अक्कलकोट येथे आहे. मुलीचे मामा खाजामा पोतेनवरू हे मैंदर्गीत राहतात. तेथे स्नेहा बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी मामाकडे होती. मामाकडे असताना आदित्यशी तिची ओळख झाली. तो स्नेहास मोबाइलवरून ‘तुझ्यासोबत लग्न करणार आहे,’ असे म्हणायचा. ‘तू तिच्याशी बोलू नको, परत आमच्या घराकडे फिरकू नको, तुझ्यासोबत आम्ही मुलीचे लग्न लावून देणार नाही,’ असं कुटुंबियांनी त्याला सांगितलं होतं. तरीही दोघं संपर्कात होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला दिलं विष दिलं अन् कुत्रं भुकू नये म्हणून…
प्रेम! प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न; आयुष्यभर तुझीच राहिल…
मुंबईतील प्रेयसीने घरी बोलवून विवाहित प्रियकराचं कापलं गुप्तांग…
पत्नीला नको त्या अवस्थेत पकडले अन् तिचे दोन प्रियकर आले…
पुणे! नकुल भोईर हत्याकांडाचा झाला उलगडा; पत्नीचा प्रियकर…

