प्रेयसीने दरोडा अन् अपहरणाचा रचला बनाव, पोलिसांनी लावला शोध…
धुळे : साक्री येथील दरोडा आणि तरुणीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित युवतीनेच ओळखीच्या प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता, हे पोलिस तपासादरम्यान उघड झाले आहे. पीडित युवतीनेच पोलिसांना अशी माहिती दिली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे दिली.
साक्री येथील सरस्वती नगरमधील घरात पाच ते सात दरोडेखोरांनी घुसून महिलेला धारदार चाकू व बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करत घरातील सोने, चांदीचे दागिने असा एकूण 88 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. शिवाय, 21 वर्षीय युवतीचेही अपहरण केले. याप्रकरणी साक्री पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला. त्या अनुषंगाने तपासचक्र फिरवून युवतीचा शोध घेऊन आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या गुन्ह्यातील आरोपी विनोद भरत नाशिककर (वय 38, रा. गायत्रीनगर, शिव मंदिर समोर शाजापूर, सौर उर्जा ठेकेदार मध्यप्रदेश) व रोहित संजय गवळी (वय 22 रा. मोगलाई, धुळे) या दोघांना मध्यप्रदेश राज्यातून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद नाशिककर हा साक्रीतील आदर्शनगर मधील संबंधित युवतीच्या घराशेजारी भाडेकरी म्हणून राहात होता. यावेळी दोघांची ओळख झाली होती. विनोद नाशिककर व युवतीने घरातून पळून जाण्यासाठी दरोडा टाकण्याचा कट रचला होता.
आदर्श नगरमधून पळून जाणे शक्य नसल्याने आत्याच्या घरी सरस्वती नगरात राहण्यासाठी युवती गेली. रचलेल्या कटानुसार विनोद नाशिककर याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या अमनसिंग व चरणसिंग यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आणखी दोघांना बोलवून हा सर्व बनाव रचला. ठरल्यानुसार संबंधित युवतीने रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याबाबत विनोदला सांगितले. ठरल्यानुसार दरोडा टाकण्यात आला. युवती, विनोद व त्याचे चारही साथीदार दरोडा झाल्यानंतर साक्रीतून रायपूरबारी येथे पोहचले. तेथून रोहीत संजय गवळी याने युवती आणि विनोद वगळता इतर चौघांना रतलाम रेल्वे स्टेशनला सोडले. आरोपी विनोद आणि युवती चारचाकी वाहनातून सर्व टोल नाके वगळून शाजापूरपर्यंत पोहचले. या काळात विनोद नाशिककर संबंधित युवतीच्या वडीलांच्या संपर्कात राहून घडलेल्या घटनेची माहिती घेत होता.
युवती मध्यप्रदेश येथील सेंधवा येथे असल्याची माहिती धुळे पोलिसांना मिळाली. युवतीला ताब्यात घेऊन पोलिसांनी आई वडीलांच्या ताब्यात दिले. युवतीने आई-वडीलांच्या मोबाईलवरून विनोद याला फोन करून साक्रीत पोहचल्याचे सांगितले. तसेच मोबाईल फॉरमॅट करून टाकण्याचे सांगितले. त्यानुसार विनोदने मोबाईल फॉरमॅट देखील केला. मात्र हा बनाव असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच संबधित युवतीला पोलिसी खाक्या दाखवताच तिने सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी विनोद नाशिककर याला अटक करून, पुढील तपास करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
धुळे जिल्ह्यात सशस्त्र दरोडा, युवतीचे अपहरण करून घेऊन गेले…
कॉलेजमधील मित्राने जबरदस्तीने अपहरण करून केला बलात्कार…
प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात घडली धक्कादायक घटना…
भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!