कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…

नवी दिल्ली: भारतीय लष्करात सेवा करणारा जवान घरी आल्यानंतर कुटुंबियांनी रेड कार्पेट टाकून आपल्या लाडक्या लेकाचे स्वागत केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच घरी परतलेल्या आपल्या लेकाच्या स्वागतासाठी घरच्यांची लगबग आणि त्यांनी केलेलं स्वागत पाहून अनेकांची डोळे पाणावले आहेत.

शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले पवन कुमार मेजर जनरल (निवृत्त) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘भारतीय लष्कारामध्ये सहभागी झालेल्या युवकाला पाहून गावकरी, नातेवाईकांना वाटणारा अभिमान पाहा. नाव, खाल्लेलं अन्न आणि निशाणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तो लढणार. आपल्याकडे असे उत्साही आणि प्रेरणा देणारे तरुण असल्यावर कोणताही देश अपयशी ठरु शकतो का?” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, ‘घरासमोरच्या ऊसाच्या शेतांच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर एक कार येऊन थांबते. या गाडीमधून उतरलेला एक लष्करी जवान समोरच उभ्या असलेल्या व्यक्तीला मिठी मारतो. त्यानंतर हा युवक घरात प्रवेश करण्यासाठी जातो त्यावेळी घराच्या गेटसमोर रेड कार्पेट टाकलेले दिसते. कार्पेटवर चालण्याआधी हा युवक सॅल्यूट करतो. त्यानंतर तो परेडमध्ये चालतात त्याप्रमाणे या कार्पेटवरुन चालत जात आईला मिठी मारतो. त्यानंतर हा युवक जमीनीवर माथा टेकून प्रणाम करतो. या युवकाचे वडील आणि गावकरी त्याच्यावर फुलांचा वर्षाव करतात. त्यानंतर हा युवक काही पावलं मागे जातो आणि आपल्या वडिलांनी तसेच भावाला सॅल्यूट करतो. त्यानंतर युवकाची आई आणि बहीण त्याला मिठाई खाऊ घालून त्याचे तोंड गोड करतात.’

दरम्यान, संबंधित व्हिडीओ व्हायरल झाला असून, अनेकांनी या युवकाबरोबरच त्याचं अनोख्या पद्धतीने स्वागत करणाऱ्या घरच्यांचे, गावकऱ्यांचही कौतुक केले आहे. आपल्या गावाबद्दल, मातीबद्दल सन्मान राखणाऱ्या या युवकाला सलाम असे अनेकांनी म्हटले आहे.

Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…

जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!