महाराष्ट्रातील सुपुत्र अखेरच्या प्रयत्नात झाला IPS अन् दिला राजीनामा…

भुवनेश्वर: ओडिशा केडरचे IPS अधिकारी सीए रामदास (चौधर अभिजीत रामदास) यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीत त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. ओडिशा पोलिस दलात अधिकारी म्हणून फील्ड पोस्टिंग मिळवण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आणि पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

ओडिशा केडरच्या अभिजीत रामदास यांचा राजीनामा चर्चेचा विषय ठरला. भुवनेश्वरचे डीसीपी जगमोहन मीणा यांनी ६ जूनला राजीनामा दिला होता. त्यांनी १३ वर्षे पोलिस दलात सेवा दिली. मीणा यांच्या राजीनाम्यानंतर पाचच दिवसांनी ट्रेनी आयपीएस अभिजीत रामदास यांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे अभिजीत रामदास यांनी IPS होण्यासाठी १० वर्षे कठोर संघर्ष केला आहे. त्यांना अनेकदा अपयश आलं. पण मेहनतीत सातत्य ठेवत त्यांनी यूपीएससीमध्ये यश संपादन केले. अखेरच्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. त्यांचं बालपण अतिशय गरिबीत गेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

अभिजीत रामदास मूळचे महाराष्ट्राच्या रुई गावचे आहेत. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे. अभिजीत यांचे सुरुवातीचं शिक्षण बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. यानंतर त्यांनी मालेगावच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इंजिनीअरिंगची पदवी संपादन केली. यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा २०२४ मध्ये अभिजीत रामदास देशात ४८७ क्रमांकावर राहिले. हा त्यांचा सहावा आणि अखेरचा प्रयत्न होता. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी विविध सन्मान सोहळ्यांमध्ये, सोशल मीडियावर आपला प्रवास सांगितला होता. त्यांच्या संघर्षानं अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली. २०१५ पासून त्यांनी नशीब आजमवलं. त्यानंतर २०१७, २०१९, २०२० आणि २०२२ मध्ये मुलाखतीपर्यंत मजल मारली. पण अंतिम यादीत त्यांना स्थान मिळाले नाही.

ओडिशाचे डीजीपी वाय. बी. खुरानिया यांनी अभिजीत यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ‘त्यांचा राजीनामा मिळालेला आहे. ते आता ट्रेनी आहेत. त्यामुळे त्यांनी ओडिशात कोणतीही फील्ड ट्रेनिंग घेतलेले नाही. त्यांच्या या निर्णयामागचे कारण आम्हाला माहीत नाही,’ असे खुरानिया यांनी म्हटले आहे.

IPS विनायक भोसले यांनी शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा केला पर्दाफाश…

IPS विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला आशाताईंचा किस्सा…

महाराष्ट्रातील मजुराचा मुलगा UPSC परीक्षेत उतीर्ण; IPS पदाला गवसणी…

अभिमानास्पद! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट…

Ex IPS शिवदीप लांडे यांची नवी इनिंग सुरू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!