पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

पुणे: पुणे शहरातील वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये अर्थात एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित विद्यार्थ्याने पुण्यातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) आवारात स्वतःवर चाकूने वार करून जगाचा निरोप घेतला आहे.

उत्कर्ष महादेव शिंगणे (वय २०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील भाग्यनगरचा रहिवासी होता. मध्यप्रदेशच्या भोपाळ येथे तो वैद्यकीय शिक्षण घेत होता. अलीकडेच तो वानवडी येथील एएफएमसीच्या मैदानावर आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ८ मे रोजी पुण्यात आला होता. सोमवारी (ता. १२) पहाटे त्याने एएफएमसीच्या वसतिगृहातील बाथरुममध्ये स्वतःला चाकू मारून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, उत्कर्ष याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या व्हॉट्सअॅपवर सुसाईड नोट पोस्ट केली होती. त्यात त्याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष गेल्या वर्षभरापासून ताणतणाव आणि नैराश्याने त्रस्त होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने समाज माध्यमाद्वारे आपल्या आई-वडिलांना एक भावनिक चिठ्ठी पाठवली होती. यासोबतच त्याने व्हॉट्सॲपच्या स्टेटसवरही ती चिठ्ठी ठेवली होती. कुटुंबीयांना चिठ्ठी मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बाथरुममध्ये उत्कर्ष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला, अशी माहिती वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी दिली. उत्कर्षने आत्महत्येसाठी वापरलेला चाकू ऑनलाइन पद्धतीने मागवला होता. याच चाकूने त्याने स्वत:वर वार करून आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येच्या आदल्या रात्री उत्कर्षने महाविद्यालयाच्या फेस्टिव्हलमध्ये आपल्या मित्रांसोबत डीजे नाईट एन्जॉय केली होती. तसेच दुसऱ्या दिवशी भोपाळला जाण्यासाठी त्याने मित्रांना तिकीटही बूक करायला लावले होते. पण अचानक त्याने १२ मेला पहाटे टोकाचे पाऊल उचलले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

www.puneganpati.com

पुणे! पिंपरी-चिंचवडमध्ये युवतीची सपासप वार करून भररस्त्यात परप्रांतीयांनी केला खून…

हृदयद्रावक! बहिणीच्या डोक्यावर अक्षता पडल्या अन् भावाचा मृत्यू झाला…

पुणे! पाकिस्तानला पाठिंबा देणारी विद्यार्थिनी अटकेत; कोर्टात ‘डुप्लिकेट’ ड्रामामुळे खळबळ…

Video: जवानांना सेल्यूट! पुढंच आईस्क्रीम लाहोरमध्येच खाणार अन् रस पिऊ…

लग्न झालेल्या जवानाला सीमेवरून बोलावणं! ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!