
Video: मी आता भारताची सून आहे, मला इथेच राहू द्या: सीमा हैदर
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. शिवाय, भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून पाकिस्तानात परत जावे लागणार आहे. पाकिस्तानमधून आपल्या प्रियकरासाठी देश सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदर हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती म्हणते आहे की, मला पाकिस्तानला जायचं नाही. सीमा हैदर हिने व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनाही आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सीमा तिचा पती सचिनसोबत दिसत आहे. सीमा हैदर म्हणते की, मला पाकिस्तानला जायचे नाही. त्या दोघांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना आवाहन केले की, मी तुमच्या आश्रयात आहे, मला त्यांच्यावर विश्वास आहे. मी पाकिस्तानची मुलगी होती, आता मी भारताची सून आहे, मला इथेच राहू द्या,’
सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, सीमाचा खटला इतर पाकिस्तानी नागरिकांपेक्षा वेगळा आहे. सीमाची सर्व कागदपत्रे गृह मंत्रालय आणि एटीएसकडे जमा आहेत. तसेच त्यांची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. सीमाला उत्तर प्रदेश कोर्टाकडून जामीन मिळाला आहे आणि ती सर्व कायदेशीर अटींचे पालन करत आहे. वकिलाने असाही दावा केला की सीमा आणि तिच्या कुटुंबाला पाकिस्तान समर्थित घटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, ज्यांच्याबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या जात होत्या.
दरम्यान, सीमा हैदरचा पहिला पती गुलाम हैदरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो सीमाला पाकिस्तानात परत पाठवायला हवे असे म्हणत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी माझ्या मुलांसाठी आसुसलो आहे. भारत सरकारने माझ्या मुलांनाही पाकिस्तानात परत पाठवावे. जर तुम्ही सीमाला पाकिस्तानला पाठवू शकत नसाल तर तिला तिथे शिक्षा करा.
View this post on Instagram
सीमा हैदर हिचा नवरा गुलाम भारतात येणार; मोठं कारण समोर…
Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…
Video: सीमा हैदर हिने देवाला हात जोडून घातलं साकडं; म्हणाली…
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…
पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…
सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…
सीमा हैदर बाबत पाकिस्तानी बालमैत्रीणीचा गौप्यस्फोट…
सीमा हैदर प्रियकरासाठी भारतात दाखल अन् पाकमधील मंदिरांत सन्नाटा….
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी? पाहा आकडेवारी…
पहलगामच्या दहशतवाद्यांबाबत मॉडेल एकता तिवारी हिने केला खळबळजनक दावा…
पहलगाममधील दहशतवाद्यांच्या घरात धडाधड झाले मोठे स्फोट…
पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…
भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

