रांजणगाव MIDC पोलिसांनी शेतीपंप चोरी करणाऱयांना केली अटक…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव-फलकेमळा येथील मोबाईल टॉवरच्या 46 बॅटऱ्यांच्या चोरी प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव इत्यादी ठिकाणी इलेक्ट्रीक रोहीत्र चोरीचे सत्र मागील काही महिन्यापासुन चालू होते. तसेच खंडाळे येथील शेतक-यांच्या शेतीपंप मोटारी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे रांजणगाव पोलिसांच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तीन जणांना अटक केली असून त्यांनी चोरीची कबुली दिली आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रांजणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाढलेल्या विद्युत मोटारी आणि रोहीत्र चो-यांमुळे परिसरातील शेतक-यांना हाताशी आलेल्या पिकाला पाणी देणे आवघड झाले होते. या चोरीच्या प्रकरणांची पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल आणि शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी गंभीर दखल घेवून या चोरांचा छडा लावण्याच्या सूचना रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना दिलेल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक ढवाण यांनी स्वतंत्र तपास पथक तयार करुन तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलिस हवालदार वैज्जनाय नागरगोजे, संतोष औटी यांना सदरचे गुन्हे उघडकिस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
सदर तपास पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणांना भेटी देवून तांत्रीक व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यांची उकल करण्याचा प्रयत्न करत असतांना पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपींबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी तपास पथकासह सापळा रचून काही संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदर गुन्हयांची कबुली दिली आहे.
सदर चोरी प्रकरणी आरोपी 1) अख्तर अली हबीबउल्ला अली (वय 36), 2) शाह नचुन मोहम्मद (वय 23), 3) रफिक अब्दुल्ला अन्सारी (वय 40, सर्वजण रा. मुळ रा. इटवा, सिध्दार्थनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. रांजणगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांना गुन्हयाच्या तपास कामी (ता. 4) रोजी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव येथील डि. पी. चोरींची तसेच खंडाळे येथील शेतीपंप मोटार चोरींची आणि कारेगाव फलकेमळा येथील मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरींची कबुली दिली आहे. त्यांच्याकडुन 125 किलो तांब्याच्या तारा, 3 इलेक्ट्रीक शेतीपंप व गुन्हयात वापरलेले वाहन असा एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असुन अटक केलेल्या आरोपीनी रांजणगाव पोलिस स्टेशनकडील एकुण 10 गुन्हयांची कबुली दिली असून रांजणगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.
शेतकऱ्यांना शेतीपंप परत देणार…
सदर चोरी प्रकरणाचा पोलिसांनी तातडीने छडा लावुन आरोपीना अटक करुन त्यांचेकडुन शेतीपंप मोटार व तांब्याच्या तार जप्त केल्याने परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. तसेच सदरच्या जप्त करण्यात आलेल्या शेतीपण मोटार या शेतक-यांच्या अडचणी लक्षात घेता लवकरात लवकर संबंधीत शेतक-यांना परत करणार असल्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगीतले आहे.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल, पुण्याचे अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, यशवंत शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश ढवाण, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, सुरज वळेकर पोलिस हवालदार वैज्जनाथ नागरगोजे, संतोष औटी, विलास आंबेकर, पोलिस नाईक माऊली शिंदे, पांडुरंग साबळे, माणिक काळुकूटे यांनी केली आहे. सदर गुन्हयांचापुढील तपास पोलिस हवालदार वैभव मोरे, संदिप जगदाळे, कल्पेश राखोंडे, अभिमान कोळेकर, गणेश आगलावे, तेजस रासकर सहायक फौजदार सुभाष गारे हे करत आहेत.
भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर
रमेश धुमाळ: अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!
अरविंद माने: अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!
वारंवार नापास झालो, पण फौजदार झालोच!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…