पहलगाममधील दहशतवाद्यांच्या घरात धडाधड झाले मोठे स्फोट…

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने आणि तपास यंत्रणेने दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्याचा तपास सुरू केला असून, पहलगाम हल्ल्यात दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरी यांची नावेही समोर आली. पोलिस आसिफ आणि आदिलच्या घरी शोध मोहीम राबवण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांच्या घरात मोठा स्फोट झाला.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दलाचे कर्मचारी आदिल आणि आसिफ शेख यांच्या घरी शोध मोहिमेसाठी गेले होते. सुरक्षा दलाच्या जवानांना धोक्याची भावना जाणवल्यानंतर थांबले. त्यानंतर एक मोठा स्फोट झाला. घरात स्फोटक पदार्थ असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच स्फोटक पदार्थांमुळे स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आदिल हा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आहे. त्याला आदिल गुरी म्हणूनही ओळखले जाते. आदिल हा बिजबेहारा येथील रहिवासी आहे. त्याचे घर एका स्फोटात उद्धवस्त झाले. पहलगाम हल्ल्यात आदिलचे नावही पुढे आले आहे. तो 2018 मध्ये कायदेशीररित्या पाकिस्तानला गेला होता. त्याने पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचा आरोप आहे. तो गेल्या वर्षीच जम्मू आणि काश्मीरला परतला आहे.

दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. एलओसीवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतीला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एका घटनेत भारतीय जवानाला पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतले आहे.

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

soldier-chandu-chavansoldier-chandu-chavan

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!