
कोंढवा पोलिस स्टेशनच्या तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात रात्रीचेवेळी दुकानांचे शटर उचकटुन चोरी करणारे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून कोंढवा पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोंढवा पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये वाढलेल्या घर फोडी तसेच चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने ०९/०८/२०२४ रोजी पेट्रोलिंग करत होते. पो. अं. संतोष बनसुडे व पो.अं. शाहिद शेख यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोंढवा पोलिस स्टेशन, पुणे शहर गु. रजि.नं. ९४०/२०२४ भारतीय न्याय संहिता अधिनियम सन २०२३ चे कलम ३३१ (४), ३०५ हा गुन्हा पोलिस रेकॉर्डवरील आरोपी अमोल अवचरे (रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) याने व त्याचा साथीदार तौसिफ (रा. कोंढवा, पुणे) यांनी मिळून केलेला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाली. सदर बातमीप्रमाणे मा. विनय पाटणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन यांचे आदेशाने पोउपनि बालाजी डिगोळे व पोलिस स्टाफ असे आरोपी अमोल अवचरे (रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) याचा शोध घेणेकामी कासेवाडी, भवानी पेठ, पुणे येथे गेले असता सदर कासेवाडी परिसरात आरोपीचा शोध घेत होते.
आरोपी अमोल अवचरे हा त्याच्याकडील काळ्या रंगाच्या होंडा डिओ दुचाकी गाडी क्र. एम.एच/१२/एन.आर / ६२४० हिचेवरुन जाताना दिसुन आला. त्यावेळी सदर आरोपी अमोल अवचरे असल्याचे बातमीदाराने सांगुन बातमीदार सदर ठिकाणाहुन निघुन गेला. त्याप्रमाणे लागलीच पोलिस स्टाफने त्यास पाठलाग करुन कासेवाडी लगत असलेल्या जैन मंदीराचे समोरील सार्वजनिक रोडवर थांबवले. त्याने अमोल किसन अवचरे (वय २७ वर्षे, रा. कॉलनी नंबर १० समोर, म्हसोबा मंदीरा शेजारी, कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) असे नाव असल्याचे सांगितले. त्यास त्याचेकडे असलेल्या दुचाकी गाडीबाबत तसेच गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास ताब्यात घेवुन त्यास कोंढवा पोलिस स्टेशन येथे आणुन त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार तौसिफ (रा. कोंढवा, पुणे) याचेसह केला असल्याचे सांगितले. तसेच सदर गुन्हा करताना त्याच्याकडे असलेली होंडा कंपनीची डिओ दुचाकी गाडी क्र. एम.एच/१२/एन.आर/६२४० ही वापरली असल्याचे सांगितल्याने सदर २५,०००/- रु. किं.ची होंडा डिओ दुचाकी, तसेच सदर गाडीच्या डिकीमध्ये १००/- रु. किं.चा एक धारदार लोखंडी कोयता, तसेच गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एक ५,०००/- रु.किं.ची १०० ग्रॅम वजनाची श्री कृष्णाची चांदीची मुर्ती त्यास सोनेरी पॉलिश केलेली तसेच १३,५००/- रु. किं.ची एकुण २७ नग चांदीचे नाणे मिळून आले आहे.
सदर आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करुन त्याचेकडे अटक मुदतीत तपास करुन त्याने व त्याचा साथीदार तौसिफ शेख (रा. कोंढवा, पुणे) तसेच यश गायकवाड (रा. कासेवाडी, पुणे) यांनी कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत व सिंहगड पोलिस स्टेशन हद्दीत शटर उचकटुन चोरी केल्याचे मान्य केले. त्यांचेकडुन खालीलप्रमाणे आणखीन शटर उचकटुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात कोंढवा तपास पथकास यश आले आहे.
१) कोंढवा पोलिस स्टेशन गु. रजि. नं. ८३७/२०२४ भा.न्या.सं.कलम ३३१(४),३०५
२) कोंढवा पोलिस स्टेशन गु. रजि.नं. ८५३ / २०२४ भा.न्या.सं.कलम ३३१ (४), ३०५
३) सिंहगड पोलिस स्टेशन गु. रजि. नं. ४२३/२०२४ भा. न्या. सं. कलम ३३१(३),३३१(४),३०५
सदर आरोपीकडुन वरील गुन्ह्यांतील मुद्देमाल त्यामध्ये सोन्याची वेढणी, चांदीचे कॉईन, मुर्ती व ब्रेसलेट, डिव्हीआर व
इंटरनेट डिस्ट्रीब्युटर व एकुण ५ रेडमी कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण १,१७,६००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपी हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुद्ध यापुर्वीचे कोंढवा पोलिस स्टेशन येथे ०२, खडक पोलिस स्टेशन येथे ०४, लष्कर पोलिस स्टेशन येथे ०३, स्वारगेट पोलिस स्टेशन येथे ०३, येरवडा, लोणीकंद, चंदननगर, पिंपरी येथे प्रत्येकी ०१ असे यापुर्वीचे एकुण १६ गुन्हे नोंद आहेत.
संबंधित कारवाई अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, आर. राजा, पोलिस उप-आयुक्त परि. ०५, धन्यकुमार गोडसे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे कोंढवा पोलिस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलिस उप-निरीक्षक बालाजी डिगोळे, सपोनि लेखाजी शिंदे, पोलिस हवालदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, पोलिस अंमलदार गोरखनाथ चिनके, शाहीद शेख, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, सुरज शुक्ला, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.
पोलिस पदकांची घोषणा; महाराष्ट्रातील 61 जणांची निवड, पाहा नावे…
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
निखील पिंगळे यांची गुन्हे शाखा उपायुक्तपदी नियुक्ती; अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभाग…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

