नाशिकमधील युवकाच्या दमबाजीचा व्हिडिओ व्हायरल…

नाशिक : नाशिक शहरात मद्यधुंद कार चालकाने एका महिलेच्या कारला धडक दिली. अपघातानंतर आपली बहिण पोलिस दलात असल्याचे सांगत मद्यधुंद युवकाने महिलेच्या मदतीसाठी धावलेल्या नागरिकांना दमदाटी केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा परिसरात युवकाच्या कारने महिलेच्या कारला धडक दिली. अपघात समोरासमोर झाल्याने यात महिला चालक जखमी झाली. यानंतर महिलेच्या मदतीला धावलेल्यांना युवकाने दमबाजी आहे.

बहिण पोलिस दलात असल्याचे सांगत युवकाने नागरिकांना दमबाजी केली आहे. संशयित युवक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. युवकाच्या दमबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अंबड पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

नाशिकमधील युवकाचे पोलिस होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

नाशिकमधील गंगापूर पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात; पाहा नावे…

नाशिकमधील दिव्याला वर्गातच भुरळ आली अन्…

नाशिक जिल्ह्यात अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!