युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…

लखनौ (उत्तर प्रदेश): आग्रा जिल्ह्यातील ताजनगरी फेज-2 येथे असलेल्या होम स्टेमध्ये शनिवारी (ता. ११) रात्री एका युवतीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी चार युवकांना ताब्यात घेतले आहे.

ताज नगरी फेज-2 मधील होम स्टे मधून मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी याबातची माहिती पोलिसांना दिली. ताजगंज पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. आरोपींनी पीडित युवतीला दारू पिण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी पीडितेसोबत गैरकृत्य केले असल्याचे समोर आहे. याप्रकरणी चार युवकांना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी पीडितेचे एक-दोन व्हिडिओ बनवले. सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परिसरात चालणाऱ्या होमस्टेमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

युवतीची चौकशी केल्यानंतर पोलिस अधीक्षक सदर अर्चना सिंग यांनी होम स्टे बंद केला आणि इतर आरोपींच्या शोधात छापे टाकण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून चार युवक आणि एका महिलेला ताब्यात घेतले. डीसीपी सिटी सूरज कुमार राय यांनी सांगितले की, ‘युवतीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला जाईल. पीडित मुलगी गेल्या दीड वर्षांपासून होम स्टेमध्ये काम करत होती.’

विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…

गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…

माणुसकीला काळीमा! बलात्कारानंतर मृतदेहाचे केले चार तुकडे….

प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या युवतीवर बलात्कार…

वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!