भोंदूबाबाने अल्पवयीन मुलींना नग्नावस्थेत पुजेला बसावे लागेल सांगून केले लैंगिक शोषण…

नागपूर : एका भोंदू बाबाने पैशाचा पाऊस पाडतो, त्यासाठीच्या पूजेसाठी तीन अल्पवयीन मुली लागतील अशी बतावणी करून तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भोंदू बाबा अब्दुल कुरैशी उर्फ कंदील बाबा याच्यासह दोघांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अब्दुल कुरैशी उर्फ कंदील बाबाने काही जणांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. पैशाचा पाऊस पाडणे शक्य आहे, त्यासाठी विशेष पूजा करावी लागेल, आणि त्यासाठी तीन अल्पवयीन मुली लागतील असे त्याने सांगितले. तिन्ही मुलींना पूजेच्या वेळेला नग्नावस्थेत बसावे लागेल अशी बतावणी केली होती. त्यानंतर आशू कोचे आणि गायत्री उकरे नावाच्या पुरुष आणि महिलेने तीन अल्पवयीन मुलींची व्यवस्था केली.

गायत्री उकरे हिच्या घरी काही दिवसांपूर्वी पूजेचे आयोजन करण्यात आले आणि त्याच ठिकाणी भोंदू बाबाने तीनही अल्पवयीन मुलींचे एकानंतर एक असे शारीरिक शोषण केले. मुलींना यासाठी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले होते. भोंदू बाबाच्या या कृत्यानंतर पैशाचा पाऊस तर पडलाच नाही, मात्र तिन्ही मुलींना त्यांचे लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नागपूरच्या मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी भोंदू बाबा अब्दुल कुरेशी याच्यासह गायत्री उकरे आणि आशू कोचे या तिघांना अटक केली आहे. पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमध्ये इतर काही मुलींचे फोटो आढळल्यामुळे या भोंदू बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आणखी काही मुलींचे लैंगिक शोषण केले आहे का? याचा शोध पोलीस घेत आहे.

प्रेरणादायी संघर्षगाथा! कोल्हापूरच्या माळरानात मेंढरं राखून बिरदेव झाला IPS…

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

डॉ. शिरिष वळसंगकर यांच्या चिठ्ठीत उल्लेख असलेली महिला गजाआड…

धक्कादायक! भोंदूबाबाने अंड्यातून काढला खिळा अन् मृतदेहाचा केला सौदा…

भोंदूबाबाच्या खोलीच्या आत खोली; महिलांना तिथे बोलवायचा अन्…

धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!