
प्रेरणादायी संघर्षगाथा! कोल्हापूरच्या माळरानात मेंढरं राखून बिरदेव झाला IPS…
कोल्हापूर: कोल्हापुरातील कागल तालुक्यातील यमगे गावच्या बिरदेव ढोणे यांने IPS पदाला गवसणी घातली. वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील युवकाने पालावर अभ्यास करत हे यश मिळवले आहे. यूपीएससी करणाऱ्या बिरदेवला पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले. मात्र, यंदा यश खेचून आणले आहे.
UPSC परीक्षेत देशात ५५१ वी रँक मिळवून भारतीय पोलिस सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्या वेळी देखील बिरदेव हा सीमाभागात मेंढ्या चारण्यासाठी घेऊन गेला होता. सीमाभागातील एका पालावर बिरदेवचा धनगरी फेटा बांधून अन् घोंगडं देऊन आगळावेगळा सत्कार करण्यात आला असून, संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बिरदेव लहान असताना, त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बिरदेवला शिक्षणासाठी मिळेल ते काम करावे लागले. लहान वयातच त्याने मेंढरे चारण्याचे काम केले. त्यातून वेळ काढून तो अभ्यास करायचा. त्याच्या या यशाचं कौतुक अख्खा महाराष्ट्र करत आहे.
बिरदेव सिद्धप्पा ढोणे या मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या तरुणाने UPSC परीक्षेत मिळवलेले यश हे खऱ्या अर्थाने डोळे दिपवणारे असं नेत्रदीपक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५५१ वी रँक मिळवून बिरदेवने संघर्ष, चिकाटी आणि मेहनतीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. बिरदेवचा संघर्ष फक्त UPSC करणारेच नाहीत तर ज्यांना छोट्या अडचणी येतात आणि खचून जातात अशा प्रत्येक युवा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
युपीएससी परीक्षेतून आज आयपीएस झाल्यानंतर त्याने आयुष्याचा खडतर प्रवास सांगितला, त्यातील एक घटना ही आमीर खानच्या सरफरोश चित्रपटातील दृश्याप्रमाणेच म्हणता येईल. ज्या पोलिसांनी बिरदेवची तक्रार घेतली नाही, तो बिरदेव आता आयपीएस अधिकारी बनला आहे. युपीएससीची मुलाखत दिल्यानंतर ज्ञानप्रबोधिनी येथील अभ्यास केंद्रावरुन जात असताना रात्री 11 वाजता राधिका भेळ येथून माझा फोन चोरीला गेला. माझा फोन चोरीला गेला ही गोष्ट मी अद्यापही घरी सांगितली नाही. घरी सांगितलंय की माझा फोन बंद पडलाय. पण खरं तर माझा फोन चोरीला गेलाय. त्यामुळे, आजही माझ्या बीडच्या मित्राचा फोन मी वापरत आहे, असे बिरदेवने सांगितले. तसेच, फोन चोरीला गेल्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनला गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला भावच नाही दिला, माझी तक्रारही घेतली नाही, असे बिरदेवने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.
विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगावमधील अथणीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता. वाड्या-वस्त्यावर, माळरानावर जाऊन शिकलेला बिरदेव आता देशसेवत आपले योगदान देणार आहे. त्याच्या या निवडीनंतर सर्वच स्तरातून त्याचा सत्कार, सन्मान केला जात आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच संघर्षगाथा बिरदेवची आहे.
बॉलीवूड अभिनेत्री पहिल्याच प्रयत्नात बनली IPS अधिकारी…
IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….
सुंदरतेसोबत हुशारी! कोणत्याही क्लासेस शिवाय बनली IPS अधिकारी…
नाशिक शहर पोलिस :
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

