पुणे शहरात लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याचा कारच्या धडकेत मृत्यू…

पुणे : लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याला कारने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ४) पहाटे स्वारगेटमधील सॅलिसबरी पार्क भागात घडली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंभूजी लाल (वय ८५, रा.गुलटेकडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत शशीकला मादीवाना (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. पुनावाला गार्डन ते महर्षीनगर पोलिस चौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

फिर्यादी या शंभूजी लाल यांच्या केअरटेकर आहेत. शंभूजी लाल हे लष्करात होते. निवृत्तीनंतर ते गुलटेकडी येथील प्लॅटमध्ये वास्तव्यास होते. सोमवारी पहाटे ते घराबाहेर पडले. महर्षीनगर चौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून ते क्रॉसिंग करत असतानाच त्यांना चारचाकीने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर तत्काळ त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानुसार, स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक राहुल कोळंबीकर पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू…

पुणे शहरात व्हिडीओ whatsapp ग्रुपला टाकून रिक्षाचालकाने उचलले मोठे पाऊल…

भीषण अपघात! दोन सख्ख्या भावांसह पाच मित्रांचा जागीच मृत्यू…

पुणे शहरात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; अनेक गाड्यांना उडवले…

नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!