मित्राने स्वप्नात येऊन केलं हैराण अन् घाबरून पोलिसांकडे जाऊन दिली कबुली…

ठाणे : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव परिसरात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभू करकडे याने किरकोळ वादातून मित्र विशाल कदम याची हत्या केली. घरमालक संदीप म्हात्रे यांच्या मदतीने मृतदेह एका ठिकाणी फेकला, मात्र हत्या केल्यानंतर आरोपी प्रभू करकडे याला 20 दिवस झोप येत नव्हती. मृत मित्र स्वप्नात येत असल्याने आरोपी प्रभू करकडे याने पोलिसांकडे धाव घेतली आणि नंतर हे प्रकरण उघडकीस आले.

डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव परिसरात दोन मित्र एका घरात दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वादातून प्रभू करकडे याने विशाल कदम याची हत्या केली. हत्येनंतर प्रभूने घरमालक संदीप म्हात्रे याला घडलेला प्रकार सांगितला. घरमालक संदीप यांनी प्रभुला सांगितले, तुझं तर अजून लग्न देखील झालेलं नाही, तुझे आयुष्य बरबाद होणार. दोघांनी मृतदेह एका गोणीत टाकून खाडी किनारी एका निर्जन ठिकाणी फेकून दिला. मात्र, या घटनेनंतर तब्बल २० दिवस प्रभू करकडे याला झोप लागत नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मृत विशाल कदम वारंवार स्वप्नात येत असल्याने अखेर त्याने क्राईम ब्रँच पोलिसांकडे धाव घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. क्राईम ब्रँच पोलिसांनी प्रभू करकडे याला ताब्यात घेऊन विष्णूनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर विष्णूनगर पोलिसांनी विशाल कदम हत्या प्रकरणी आरोपी प्रभू करकडे आणि घरमालक संदीप म्हात्रे यांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आई स्वप्नात येऊन म्हणाली, ‘तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये…

युवकाच्या स्वप्नात यायचा सतत मृतदेह अन् सांगायचा…

मुलगा स्वप्नात येऊन विचारायचा; आई तू मला का मारले? अन् पुढे…

पुणे! पायलच्या लग्नासाठी लाखो रुपयांचा खर्च; मुलगी झाल्यानंतर वाद अन् भावाला शेवटचा मेसेज…

हृदयद्रावक! IT इंजिनिअरच्या पत्नीने मुलासह संपवलं जीवन, चिठ्ठी वाचून मन सुन्न…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!