
पोलिस भरतीवेळी प्रेम, नोकरी अन् युवतीने घेतला जगाचा निरोप…
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचा धक्कादायक शेवट झाल्याची घटना घडली आहे. पोलिस भरतीची तयारी करताना जुळलेले प्रेमसंबंध, त्यानंतर मिळालेली सरकारी नोकरी, बदललेलं नातं आणि अखेर मानसिक छळ अन् अपमानाच्या आरोपातून एका युवतीने (वय २२) जीवन संपवले आहे.
युवतीच्या मृत्यूनंतर आईने न्यायासाठी पोलिसांकडे धाव घेतली आणि अखेर दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कुरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण असून, शिखामार कसार आणि एका महिला पोलिस शिपाईला अटक करण्यात आली आहे. मृत युवतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे.
View this post on Instagram
पोलिस भरतीच्या तयारीदरम्यान सुरू झालेलं प्रेम, त्यानंतर प्रियकराला नोकरी मिळाली. मात्र, युवतीला अपयश आले होते. याच काळात दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. त्यातच महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून फोनवरून अपमानास्पद भाषा वापरल्याने या सगळ्या मानसिक धक्क्यांमधून युवतीने 7 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. अखेर 52 दिवसांनी या प्रकरणाला कायदेशीर वळण मिळाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट, शिक्षकाकडून प्रेयसीची निर्घृण हत्या अन्…
कोल्हापूर! लग्न ठरल्याने प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून; प्रियकराने सांगितले…
पंढरपूर! वयाच्या सत्तरीमधील प्रेम अन् वृद्ध प्रेयसीने केले नको ते कांड…
पुणे! व्यावसायिकाचा प्रेयसीसोबत परदेशात जायचा बेत अन् घडलं भलतंच…
विवाहित प्रेयसीला घेऊन गेला एकांतात अन् प्रेयसी किंचाळच लागली धावू…

