सुंदरतेसोबत हुशारी! कोणत्याही क्लासेस शिवाय बनली IPS अधिकारी…

प्रयागराज (उत्तर प्रदेश) : आयपीएस अंशिका वर्मा या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आयपीएस अधिकारी झाल्या आहेत. कोणत्याही शिकवणी शिवाय ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून, सोशल मीडियावर त्यांचा फॉलोअर्सची संख्या मोठी आहे.

अंशिका वर्मा या मुळच्या प्रयागराजच्या आहेत. गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेक केल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली होती. लहानपणापासून नागरी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न होते.

इंजिनीअरिंग केल्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. यूपीएससीसाठी कोणत्याही क्लास लावला नाही. 2020 मध्ये तिने पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. मात्र, यश मिळाले नाही. अपयशानंतरही खचून न जाता अभ्यास सुरूच ठेवला. 2021 मध्ये तिने पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. यावेळी तिला देशात 136 वा क्रमांक मिळाला आहे. तिला यूपीएससीमध्ये एकूण 972 गुण मिळाले. लेखी परीक्षेत 796 तर मुलाखतीत 176 गुण मिळाले होते.

UPSC उत्तीर्ण झाल्यानंतर अंशिका वर्माची IPS साठी निवड झाली. आयपीएसमध्ये निवडीसोबतच तिला होम केडरही मिळाले. अंशिका सोशल मीडियावर लोकप्रिय चेहरा असून, २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!

अनिकेत पोटे : ‘फिटनेस’बाबत दक्ष अधिकारी!

अरविंद माने: अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!