दिल्ली पोलिस मुख्यालयासमोर कॉ़न्स्टेबल्सच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे एसीपी मनस्वी वसिष्ठ निलंबित…

नवी दिल्ली: दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नेतृत्त्व करणाऱ्या एसीपी मनस्वी वसिष्ठ यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे वर्तन चुकीचे असल्याचे मानून अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दिल्लीतील शाहदरा पोलीस ठाण्यात पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती.

या घटनेच्या निषेधार्थ, महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह सुमारे १०० पोलीस सोमवारी सकाळी दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर जमले आणि त्यांनी आंदोलन केले. फलक आणि पोस्टर्स घेऊन, आंदोलन करणाऱ्या पोलिसांनी सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) मनस्वी वसिष्ठ आणि शाहदरा स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) अरुण कुमार यांना त्यांच्या जुन्या पदांवर पुन्हा रुजू करण्याची मागणी केली.

पोलीस ठाण्यात पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या झटापटीतून या वादाला सुरुवात झाली होती. या घटनेत एक वकील जखमी झाला होता. वकिलांनी अनिश्चित काळासाठी संप पुकारल्यानंतर, एसीपी आणि इन्स्पेक्टर यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर वकिलांनी आपला संप मागे घेतला. पोलीस अधिकाऱ्यांच्या आंदोलनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना, पत्रकारांशी बोलताना एसीपी वशिष्ठ म्हणाले, की हे आंदोलन एक नैसर्गिक आवाहन असून, ते त्यात सहभागी होतील. आंदोलन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी वकिलांवर गैरवर्तन आणि धमक्या दिल्याचा आरोप केला.

२३ ऑक्टोबर रोजी शाहदरा पोलीस ठाण्यात झालेल्या झटापटीत वकील ललित बन्सल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा न्यायालयाच्या वकिलांनी अनिश्चित काळासाठी संप पुकारला. २८ ऑक्टोबर रोजी, दिल्ली पोलिसांनी गांधीनगर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एसीपी मनस्वी वशिष्ठ यांची महिला आणि बालकांसाठीच्या विशेष पोलीस युनिटमध्ये बदली केली. शाहदरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन एसएचओ अरुण कुमार यांची सुरक्षा युनिटमध्ये बदली करण्यात आली.

वरिष्ठ अधिकारी आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी देतील. आम्ही मोकळेपणाने बोलू आणि या प्रकरणावर नक्कीच तोडगा निघेल. पोलिसांना सामोरे जाव्या लागणाऱ्या गुंडगिरीविरुद्ध आणि पोलीस ठाण्यांमध्ये निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या समस्यांविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक असल्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले आहे. काही व्यक्ती गुंडगिरी करत आहेत आणि ते केवळ आमचेच नव्हे, तर संपूर्ण समाजाचे शत्रू आहेत. जर पोलीस ठाणीच सुरक्षित नसतील, तर कोणतीही जागा सुरक्षित असू शकत नाही, असे मनस्वी वसिष्ठयांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!