
आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात आढळला संशयास्पद अवस्थेत मृतदेह…
नंदूरबार: आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबारमधील विमला हाऊसिंग परिसरातील शासकीय मुलींच्या वस्तीगृहातील एका वीस वर्षीय मुलीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या मुलीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मयत मुलगी ही नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. पण, मुलीचा घातपात झाल्याचा तिच्या पालकांचा आरोप आहे.
मुलीच्या वस्तीगृह प्रवेश आणि पालक कागदपत्रावर तिच्या आई-वडिलांना एका अनोळखी मुलाचा भाऊ म्हणून फोटो आढळला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा मुलगा मुलीच्या संपर्कात होता. मुलीने मध्यरात्री आत्महत्या केली असताना सकाळी दहा वाजता संबंधित संशयित तरुणाने तिच्या कुटुंबीयांना कळवले. मात्र, वस्तीगृह प्रशासन आणि आदिवासी विकास विभाग यांनी बारा वाजता कुटुंबीयांना मुलीच्या मृत्यूबद्दल माहिती दिली होती. तोरणमाळहून आलेल्या तिच्या कुटुंबीयांनी आक्रोश करत संताप व्यक्त केला.
View this post on Instagram
संबंधित मुलासह वस्तीगृहातील वार्डन आणि कर्मचारी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करणार नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवणार नसल्याची कुटुंबीयांची आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकऱणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आश्रम शाळेत विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.
पुणे! पायलच्या लग्नासाठी लाखो रुपयांचा खर्च; मुलगी झाल्यानंतर वाद अन् भावाला शेवटचा मेसेज…
माजी जवान चंदू चव्हाण यांच्या विरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल….
मुग्धा लंडनहून गुपचूप आली पुण्यात अन् मृत्यू; चक्रावून सोडणारा घटनाक्रम…
पत्नीचे जीम ट्रेनरसोबत प्रेमसंबंध; पहाटे प्रियकराला घरी बोलवलं अन्..
मुलींना नको तिथे हात लावायचा, आदिवासी आश्रम शाळेतील 21 विद्यार्थिनींचा विनयभंग…
अल्पवयीन आदिवासीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला १० वर्षांची शिक्षा…

