इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत उत्तर; संदीप पाणीपुरी खात असतानाच झाला गतप्राण…
नाशिक : अंबड येथील शिवाजी चौकात टोळक्याने पाठलाग करून केलेल्या हल्ल्यात संदीप नावाच्या युवकाचा मृत्यू झाला आहे. इंस्टाग्रामवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याने हा वाद झाला होता आणि यातूनच संदीप याचा खून झाल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
काही दिवसांपूर्वी संदीप याने ओम पवार उर्फ ओम्या खटकि यांना मारहाण केली होती. हॉटेलमध्ये ही मारहाण झाली होती आणि या मारहाणीचा व्हिडिओ संदीप याने इन्स्टाग्राम वर टाकला होता. याचाच राग ओम पवार उर्फ ओम्या खटकी याला आला होता आणि त्याने संदीपचा काटा काढण्याचे ठरवले. गुरुवारी सायंकाळी अंबडच्या शिवाजी चौकात संदीप पाणीपुरी खात असताना ओम्या व त्याचे साथीदार शिवाजी चौकात आले. अवघ्या काही सेकंदात संदीप वर सपासप वार केले. या हल्ल्यानंतर संदीप गतप्राण झाला. ओम्या खटकी याने इन्स्टाग्राम वर लाईव्ह करत उत्तर दिले.
फक्त इंस्टाग्राम वर मारहाणीचा व्हिडिओ टाकल्याने संदीप चा खून झाला पूर्ववैमान्यातून हा खून झाला आहे. या महिन्यातील अंबड परिसरातील हा चौथा खून आहे. या घटनेनंतर संदीपच्या नातेवाईकांनी जो पर्यंत हल्ले खोरांना अटक करत नाही तो पर्यंत मूर्तदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्ती करत नातेवाईकांची समजूत काढली आणि अवघ्या काही तासात खून प्रकरणी पाच संशयितांना तात्काळ अटक केली. यामध्ये एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे
दरम्यान, संदीपने खटक्याला मारहाण करतानाच चित्रीकरण केले होते आणि त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. त्याचाच राग मनात धरून संदीप वर हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…
नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…
भाजी विक्रेत्या युवकावर हल्लेखोरांनी दिवसा सपासप केले वार…
Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…
युवकांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला जगाचा निरोप; चिठ्ठीत म्हटले की…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…