Video: पाकिस्तान जिंदाबाद नाही म्हणणार तर काय म्हणणार?

बेंगळुरू: बेंगळुरू येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहत्यांना ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणा देणाऱ्या चाहत्याला पोलिसांनी रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संबंधित व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ‘एक पोलिस अधिकारी हे पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना ‘पाकिस्तान जिंदाबाद’ या घोषणा देण्यापासून रोखत आहेत. त्यामुळे सामना बघायला आलेले पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी संतापले आहेत. पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी पोलिस अधिकाऱ्यांना म्हणत आहे की, ‘मी पाकिस्तानी आहे, मग पाकिस्तान जिंदाबाद नाही म्हणणार तर काय म्हणणार?’

संबंधित व्हिडिओवर नेटिझन्स प्रतिक्रिया नोंदवत आहेत. पाकिस्तान संघाचे संचालक मिकी आर्थर यांनीही भारतात होणारा विश्वचषक हा आयसीसीचा कार्यक्रम नसून बीसीसीआयचा कार्यक्रम बनल्याचा आरोप केला होता. स्टेडियममध्ये पाकिस्तानी संगीत वाजवले जात नाही किंवा अनेक पाकिस्तानी चाहत्यांना भारतात येण्यासाठी व्हिसा मिळत नाही, असेही त्यांचे मत होते.

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

दीड कोटी जिंकलेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई…

करोडपती झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाची होणार चौकशी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!