मुंबई पोलिसांच्या बनावट वेबसाईटप्रकरणी गुन्हा दाखल; बनावट वेबसाइट कशी ओळखाल…

मुंबई : मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळा सारखे दिसणार हुबेहूब संकेतस्थळ सायबर गुन्हेगारांनी तयार केले होते. ट्विटरवरून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला त्याची ओळख अपलोड करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी तगादा लावला होता. अन्यथा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. तक्रारदाराने चौकशी केली असता वेबसाईट बनावट असल्याचे उघड झाले आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना यासंदर्भात माहिती देत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

फसव्या आणि बनावट वेबसाइट कशा ओळखाल?
1. URL कडे लक्ष द्या. (Pay Close attention to URL) : फसव्या आणि बनावट वेबसाइट ओळखण्यासाठी आधी वेबसाईटच्या URL कडे लक्ष द्या. कोणत्याही नवीन वेबसाईटचा URL नीट तपासून पाहा. प्रत्येक वेबसाईटचा URL वेगळा असतो. फसव्या आणि बनावट वेबसाइटच्या URL मध्ये एखादं अक्षरं किंवा शब्द कमी-जास्त असतो.

2. वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना कनेक्शन तपासा: वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना HTTP वेबसाईटवर विश्वास ठेऊ नका. सुरक्षिततेची हमी आहे ते तपासून पाहा.

3. ट्रस्ट सील तपासा: अधिकृत वेबसाईटवर ट्रस्ट सील असतो. हा ट्रस्ट सील त्यांची अधिक वेबसाईट अधिकृत वेबसाईट ओळखण्यासाठी आवश्यक अधिकृत आणि बनावट वेबसाईटमधील फरक दाखवतात. हे ट्रस्ट सील मुख्यत: होमपेजवरच असते. त्यामुळे ट्रस्ट सील तपासल्यास तुमची फसवणूक होणार असल्यास ती टाळता येते.

4. वेबसाईटच्या प्रमाणपत्राचा तपशील पाहा: कोणतीही नवीन वेबसाईट वापरताना त्या वेबसाईटच्या प्रमाणपत्राचा तपशील पाहा. यामुळे तुम्हाला वेबसाईट बनावट आहे की अधिकृत हे समजण्यास मदत होईल. प्रमाणपत्राचा तपशील तपासल्याने तुमचा वेबसाईटवरील विश्वास वाढेल.

5. सुरक्षित ब्राऊझिंग: अनेक वेळा तुमचा ब्राऊझर तुम्हाला वेबसाईटच्या धोक्याबाबत इशारा देत असतो. त्याकडे दुर्लक्ष करु नका.

मुंबई पोलिसांनी फसव्या आणि बनावट वेबसाइट कशा ओळखण्याचे हे मार्ग सांगितले आहेत. याशिवाय सायबर गुन्ह्यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यात तुम्ही मुंबई पोलिसांच्या 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा https://cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रान नोंदवू शकता.

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला धमकीचा फोन…

मुंबई पोलिसांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल अन् पैसे…

मुंबई पोलिस दलातील कंत्राटी भरतीचे वृत्त गृह विभागाने फेटाळले…

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…

असा आहे पोलिस दलाचा इतिहास…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!