एम. एम. गँगचा म्होरक्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे: पुणे पोलिसांना दोन महिन्यांपासून गुंगारा देणारा एम. एम. गँगचा म्होरक्या व मोक्क्यातील फरार आरोपी मंगेश अनिल माने उर्फ मंग्या (वय २६ वर्षे, रा. सरगम चाळ, अप्पर बिबवेवाडी, पुणे) याला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

फिर्यादी रोहित अशोक खंडाळे (वय २४, रा स.नं. ५९, गल्ली नं ०४, शिवछत्रपती शाळे जवळ, कोंढवा बु., पुणे हे साईनगर गल्ली नं ०२) येथे फिरत असताना आरोपी १) मंगेश माने, २) सागर जाधव, ३) पवन राठोड, ४) सुरज पाटील व ५) अभिजीत दुधणीकर यांनी फिर्यादी हे त्यांचा मित्र वैभव साळवे याच्या बरोबर फिरतात या कारणावरून फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्याकडील लोखंडी धारदार कोयत्याने फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या डोक्यामध्ये, डावे हाताचे बोटावर, मनगटाखाली उजव्या हाताचे दंडावर वार करून गंभीर जखमी केले होते. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ३२७ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०७,३२३,३२३,५०४,१४३, १४७, १४८ शस्त्र अधिनियम कलम ४(२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ तसेच मोक्का कायदा कलम ३ (१)(ii) ३ (२), ३ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व अंमलदार यांनी सदर आरोपीतांचा शोध घेवून यातील आरोपी नामे १) सागर जाधव, २) पवन राठोड, व ३) अभिजीत दुधणीकर यांना यापुर्वी अटक केली होती. परंतु, आरोपींचा म्होरक्या मंगेश माने हा सतत पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. त्यामुळे पुणे शहर पोलिस दल त्याचा शोध घेत होते. सदर आरोपी व त्याच्या मित्रांनी कोंढवा, बिबवेवाडी, भारती विद्यापिठ, मार्केटयार्ड या पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड करून स्वतःची व स्वतःच्या एम. एम. गँगची दहशद निर्माण केली होती. २७/०६/२०२३ रोजी कोंढवा तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व अंमलदार हे हद्दीमध्ये बकरी ईद व आषाढी एकादशी च्या अनुषंगाने हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत होते.

पोलिस अंमलदार/४९० सुरज शुक्ला व पोलिस अंमलदार/२१८५ सुजीत मदन यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंगेश माने हा गोकुळनगर पाण्याचे टाकी जवळ येणार आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील पोहवा / ११६१ सतिश चव्हाण, पोहवा / ७९ निलेश देसाई, पोना/७७८२ जोतिबा पवार, पोना/८४८६ गोरखनाथ चिनके, पोअं/१०११६ सागर भोसले, पोअं./८५९१ लक्ष्मण होळकर, पो. अं. / ९८३८ संतोष बनसुडे, पोअं/२१८५ सुजित मदन, पोअं. ४९० सुरज शुक्ला व पो. अं./ ४८४५ अनिल बनकर यांनी सापळा रचून आरोपी मंगेश अनिल माने उर्फ मंग्या (वय २६ वर्षे, रा. सरगम चाळ, अप्पर बिबवेवाडी, पुणे) यास शिताफीने ताब्यात घेवून त्यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक केली आहे.

संबंधित कारवाई ही पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – ५ विक्रांत देशमुख, सहा. पोलिस आयुक्त वानवडी विभाग शाहुराव साळवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक गुन्हे संजय मोगले व मा. पोलिस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोहवा / ११६१ सतिश चव्हाण, पोहवा / ७९ निलेश देसाई, पोना/८४८६ गोरखनाथ चिनके, पोना/७७८२ जोतिबा पवार, पो. अं. / २१८५ सुजित मदन, पो. अं./ ९८३८ संतोष बनसुडे, पो.अं./८५९१ लक्ष्मण होळकर, पो. अं./१०११६ सागर भोसले, पो.अं./ ४९० सुरज शुक्ला व पो.अं./४८४५ अनिल बनकर यांच्या पथकाने केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!