
पुणे शहरातील मुलींच्या डोळ्यां देखत खून; अनैतिक संबंधातून पत्नीनेच…
पुणे: पुणे शहरातील कर्वेनगरमध्ये अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकरामार्फत खून करवून चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा बनाव रचला. पोलिसांनी हा गुन्हा काही वेळातच उघड केला आहे. अमोल निवंगुणे या व्यक्तीचा त्यांच्या मुलींच्या समोरच हत्याराने भोसकून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कर्वेनगर येथे श्रीमान सोसायटीमधील अमोल पंढरीनाथ निवगुंने (वय 42) यांचा रात्री अंदाजे एक वाजता घरात घुसून टोकदार हत्याराने पोटात वार करुन खून करण्यात आला आहे. वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजण्याच्या दरम्यान त्याचा दरवाजा अज्ञातांनी वाजवला. कोणी आले असल्याचा अंदाजाने अमोल यांनी घराचा दरवाजा उघडला असता आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. अमोल यांनी आरडाओरडा केल्या नंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या होत्या. पण, आरोपी तोपर्यंत घरातील दागिने आणि रोख रक्कम, किंमती वस्तु घेऊन करुन पसार झाला होता.
मृत अमोल पंढरीनाथ निवगुंने हे एका खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करत असून त्यांना तीन मुली आहेत. आरोपीने तोंडावर बुरखा घातला असल्याने मुलींनी आरोपीला पाहिले होते. पण, ओळखता आले नव्हते. आपल्या डोळ्यासमोरच वडिलांचा खून झाल्याने मुलींच्या मनावर मोठा आघात झाला आहे. त्या बोलण्याचा मनस्थितीत नव्हत्या. मात्र तपासात अमोल निवंगुणे यांच्या पत्नीनेच ही हत्या घडवून आणल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी जेव्हा राहुल यांच्या पत्नीकडे चौकशी केली तेव्हा घातपाताचा संशय आला. पोलिस चौकशीत पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पतीला अनैतिक संबंध समजले होते आणि प्रेमात तो अडसर ठरत होता. त्यामुळे पत्नीने पतीची प्रियकराकडून हत्या घडवून आणली.
पत्नी आणि मुली पोहोचेपर्यंत आरोपीने राहुल यांच्यावर सपासप वार केले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर आरोपीने घरातले दागिने आणि रोख रक्कम, किंमती वस्तू घेऊन तिथून पळ काढला अशी माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पण पोलिसांना पत्नीवर संशय आल्याने त्यांनी कसून चोकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
पुणे हादरलं! बुरखा घालून घरात शिरले अन् मुलींच्या डोळ्यादेखत केली हत्या…
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…
पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…
पुणे शहरात खूनसत्र थांबेना; युवकाची मध्यरात्री हत्या…
पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…
पुणे शहरात गुंडाची हत्या; टोळक्याने पाठलाग करून ठेचलं…
वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…

