
गोंदिया पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन रावबून केला शस्त्रसाठा जप्त…
गोंदिया : लोकसभा निवडणूक आणि होळीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये देशी कट्टा, चार तलवारी आणि एका गुप्तीचा समावेश आहे.
गोंदिया पोलिसांनी शहरातील गौतमनगर, कुंभारेनगर आणि छोटा गोंदिया परिसरात राबवण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घराची झडती घेतली. यात एक देशी कट्टा, चार तलवारी आणि एक गुप्ती जप्त करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे, सोबतच अवैध दारूबंदी कायद्यांतर्गत देखील तीन कारवाया करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
गोंदियामध्ये मृत पोलिसकाकाच्या कुटुंबियांना धनादेशाचे वाटप…
गोंदिया जिल्ह्यात पोलिसांची अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाई…
गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १७ जनावरांची केली सुटका…
गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या २४ जनावरांची केली सुटका…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

