वर्दीतील सुपरवुमन! डॉ. शितल खराडे-जानवे….
मुलगी शिकली, प्रगती झाली… हे वाक्य चांगलचं लोकप्रिय आहे. या घोष वाक्याला साजेशी कृती केली तर याचा जीवनाला अर्थ आहे. इच्छाशक्ती, जिद्द आणि ध्येयापर्यंत पोहचण्याची चिकाटी जर आपल्या अंगी असेल तर आपले ध्येय साध्य झाल्या शिवाय राहत नाही. याची आपल्याला वेळोवेळी उदाहरणे पाहायला मिळतात. याच इच्छा शक्तीच्या जोरावर पोलिस उपअधीक्षक डॉ. शितल खराडे-जानवे यांनी यशाला गवसणी घातली आहे ….
अल्प परिचय….
डॉ. शितल खराडे-जानवे यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा या गावी झाला. लहानपनापासून घरात संस्कार व शिस्त असल्याने त्यांना त्याचा फायदा झाला. आपण नेहमी म्हणतो आई-वडील व शिक्षकांचे आशिर्वाद असतील तर मुलांच्या शिक्षणात हातात देशाचे भविष्य असते. कारण, शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई वडीलांच्या चांगल्या संस्कारावर शितलने आपले पाऊल टाकायला सुरुवात केली. लहानपणापासून डॉ. शितल यांना शिक्षणाची रुची प्राप्त झाली होती. शिवाय, स्वभाव खुप खोडकर व जिद्दी होता.
प्राथमिक शिक्षण ते वैद्यकीय पदवी व पोलिस उपअधीक्षक प्रवास..
▪️ प्राथमिक शिक्षण शेठ रुईया विद्यालय महानगरपालिका येथे घेतले ..
▪️ महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद महाविद्यालयात घेतले.
▪️ विज्ञान शाखेतून अकरावी व बारावीचे शिक्षण पुर्ण केले.
▪️ महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्या पदवीधर शिक्षणासाठी वैद्यकीय कॉलेज येथे रूजू झाल्या. पुढे त्यांनी बी.एस.मधून पदवी देखील प्राप्त केली आहे. स्त्री उद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे, म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजचे आहे. हे डॉ. शितल खराडे -जानवे यांच्या शिक्षणातून दिसून येते…
शासकीय सेवेला सुरुवात…
शासकीय कारकीर्दीची सुरुवात गव्हर्मेंट मेडिकल ऑफिसर, कोल्हापूर येथून पंचायत समिती पन्हाळा येथून केली. 2008 ते 2013 या कालावधीत त्यांनी येथे काम केले. 2011 मध्येच त्यांनी एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा दिली होती. याच कालावधीत त्यांची पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. लहानपणापासून खाकी वर्दीत जाण्याचे स्वप्न अखेर पुर्ण झाले. नाशिक येथे ट्रेनिंग झाल्यानंतर 2013 पासून त्या पोलिस उपअधीक्षक या पदावर कर्तव्यासाठी रूजू झाल्या.
खाकी वर्दीतील कर्तव्याचा प्रवास सुरू…
सुरुवातीला त्यांची नियुक्ती यवतमाळ येथे प्रोबेशनरी पोलिस उपाधिक्षक म्हणून झाली व आपल्या सेवेचा श्रीगणेशा केला. त्यांनी सुरवाती पासून न्यायाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांची बदली नाशिक, रत्नागिरी, चिपळून, खेड येथे त्यांची नियुक्ती झाली. पुढे त्यांनी पुणे येथे राज्य गुप्तवार्ता विभागात देखील कर्तव्य बजावले आहे. 2016 मध्ये रत्नागिरी येथे डिजिटल आधार आधरीत पोलिस भरती घेणारे पहिले कार्यालय आहे व यांचे नेतृत्व डॉ. शितल खराडे-जानवे यांनी केले होते. त्यांनी आज अखेर वेगवेगळ्या पदांवर कर्तव्य बजावले असल्याने अनुभवाची कोणतीही कमी नाही..
सातारा जिल्ह्यात कौतुकास्पद कामगिरी…
सातारा जिल्ह्यात सन 2020 साली डॉ. शितल खराडे-जानवे यांची वाई उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती त्यांनी सार्थ ठरवत कायदा सुव्यवस्था अबाधित राखत कोरोनाच्या कठीण काळात देखील यशस्वीपणे कर्तव्य बजावले. त्यांनी एक वेगळी छाप पाडली होती. याच वेळी प्रतापगड अतिक्रमण हटाव मोहीमे मध्ये त्या सहभागी होत्या. घडलेल्या गुन्ह्यांवर त्यांची पारखी नजर असायची. एवढंच काय मुख्यमंत्री आपल्या सातारा जिल्ह्यातील निवासस्थानी येत असताना भर पावसाळ्यात आपल्या कन्येला सोबत घेऊन त्यांनी बंदोबस्ताची जवाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. याचं काळात खाकीतली स्त्री शक्ती काय असते याची प्रचिती आली होती. सातारा जिल्ह्यात त्यांनी आपले कर्तव्य पणाला लावून अडथळ्यांच्या शर्यती पार करीत अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधत आपल्या पदाचा आविर्भाव न दाखवता कर्तव्य बजावले नुकतीच त्यांची सातारा येथून पुढे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
डॉ. शितल खराडे-जानवे यांची भावना….
आपण जेंव्हा जीवनाचा प्रवास करत असतो. तेव्हा मार्गदर्शनाची जास्त गरज असते. मग तुम्ही मार्गदर्शन घेत असताना क्लास च्या बेसिकवर घ्या. तुमचे सिनियर असतील त्यांच्याकडून घ्या. योग्य मार्गदर्शन मिळाले तर तुम्ही जे ध्येय गाठणार आहात,आपण नेहमी म्हणतो की फक्त मुलगाच आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकतो, एकदा मुलींना पण संधी देऊन बघा, त्या संधीच सोन केल्याशिवाय मुली पण माघार घेत नाही. आपल्या देशभरात बऱ्याच अशा मुली आहेत की त्यांनी त्यांच्या आई वडिलांचे नाव रोशन केले आहे. इच्छाशक्ती, जिद्द आणि ध्येयापर्यंत पोहचण्याची चिकाटी जर आपल्या अंगी असेल तर आपले ध्येय साध्य झाल्याशिवाय राहत नाही, याची आपल्याला वेळोवेळी उदाहरणे पाहायला मिळतात. याच इच्छाशक्तीच्या जोरावर मी हे यश संपादन केले आहे.
– उदय आठल्ये
जयश्री देसाई: खाकी वर्दीतील दामिनी!
पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग Video Viral…
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर
पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!
अनिकेत पोटे : ‘फिटनेस’बाबत दक्ष अधिकारी!
क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!