
Cyber Crime! ‘गुगल’वर सर्च केले हॉटेल अन् दोन लाखांची झाली फसवणूक…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील एका कंपनीच्या अधिकाऱ्याला सायबर गुन्ह्याचा फटका बसला आहे. ‘गुगल’वर हॉटेलचा शोध घेताना ते सायबर भामट्याच्या जाळ्यात अडकले आणि त्यांना जवळपास 2 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी कंपनी बिडकीनमध्ये 636 एकरांवर 27 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक मोठा प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी सहाय्यक उपाध्यक्ष कृष्णचंद श्रीवास्तव (वय 56) हे शहरात वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी कामाचा आढावा घेण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ शहरात येणार होते. त्यांच्या निवासासाठी कृष्णचंद यांनी गुगलवर जिंजर हॉटेलचा संपर्क क्रमांक शोधला. तेव्हा पहिल्याच पर्यायात आलेल्या क्रमांकावर त्यांनी कॉल केला. कॉलवरील व्यक्तीने स्वतःला हॉटेल जिंजरचा व्यवस्थापक असल्याचे सांगितले.
कृष्णचंद यांना संबंधित सायबर भामट्याने ऑनलाईन पेमेंटवर 20 टक्के सूट देण्याचे आमिष दाखवले. कृष्णचंद यांच्याकडून क्रेडिट कार्ड क्रमांक घेतला आणि ओटीपीची मागणी केली. ओटीपी प्राप्त झाल्यानंतर बँकेने कृष्णचंद यांना संपर्क करून व्यवहाराबाबत खातरजमा केली. तेव्हा आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बँकेच्या कॉलवरच व्यवहार थांबवण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत सायबर गुन्हेगारांनी खात्यातून 1 लाख 90 हजार रुपये वळवले होते. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ‘गुगल’वर सर्च करून आलेली माहिती खोटी किंवा सायबर गुन्हेगारांची असू शकते. सर्च रिझल्टवर विश्वास ठेवण्याआधी हॉटेल किंवा अन्य काहीही शोधताना, गुगलच्या पर्यायांपेक्षा संबंधित कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर माहितीची खात्री करा. पहिल्याच सर्च रिझल्टवर क्लिक करू नका. तसेच ऑनलाईन पेमेंट करताना कुणालाही ओटीपी शेअर करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुणे! कोंढवा पोलिसांनी ४३,०४,०६० रूपये फिर्यादीस दिले परत मिळवून…
एटीएम कार्ड बदलून खात्यातून पैसे काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना अटक…
ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…
डिजिटल अरेस्टसाठी तोतया पोलिस अधिकाऱ्याचा VIDEO कॉल अन् युवकाची शक्कल…
धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…
Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…
नवरदेवाने इन्स्टन्ट लोन कंपनीकडून पैसे घेतले पण एजंट्सनी पत्नीचे फोटो केले मॉर्फ अन्…
Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…
एकाला तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा; कसा पाहा…
पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…
Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…
Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…
पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…
आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…
युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…
सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…
महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

