
पुणे शहरात चिमुकलीवर लॉजवर बलात्कार; आरोपीसह लॉज मालकही अटकेत…
पुणे : पुणे शहरात घरा शेजारीच राहणार्या एका व्यक्तीने 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीसह लॉजमालक आणि मॅनेजरला अटक केली आहे.
पुणे शहरातील वारजे परिसरात ही घटना घडली आहे. वारेज परिसरात 10 वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. लॉजवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना 21 मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पीडित मुलगी रस्त्यावरून दुकानात जात होती. या वेळी आरोपी राहुल गौतम आणि त्याचा साथीदार मित्र अविनाश डोमपल्ले या दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिचे अपहरण केले. त्यानंतर या पीडित चिमुकलीला उत्तमनगर येथील पिकॉक लॉजवर घेऊन गेले. तेथे राहुल गौतम याने तिला तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
आरोपी हा पीडित चिमुकलीच्या शेजारी राहणारा व्यक्ती आहे. आरोपीने या पीडित अल्पवयीन मुलीवर उत्तमनगर येथील एका लॉजवर बलात्कार केला. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या दोघांसह लॉजच्या मालकासह तेथील मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गौतम, अविनाश अशोक डोमपल्ले, पिकॉक लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉजचा मॅनेजर टिकाराम चपाघई अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे! विद्येच्या माहेरघरात युवतीवर केला बलात्कार…
पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….
पुणे! स्वारगेट प्रकरणातील पीडित युवतीचे पोलिसांवर गंभीर आरोप…
पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…
पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

