महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

अहमदनगर : अहमदनगरमधील एका महिलेच्या खात्यामधून एका क्षणात लाखो रुपये गायब झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिवानी वाघ यांचे एका बँकेमध्ये खाते असून, त्या त्याच बँकेच क्रेडिट कार्ड वापरतात. त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला आणि म्हणाला की, ‘तुम्ही वापरत असलेल्या क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट तुमच्या खात्यावर जामा करायचे आहेत, त्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा.’ शिवानी वाघ यांनी आपल्या मोबाईलचा ओटीपी त्या व्यक्तीला सांगितला. पुढच्या क्षणात त्यांच्या मोबाईलवर तीन लाख रुपये डेबीट झाल्याचा मेसेज आल्यामुळे त्यांना धक्का बसला.

दरम्यान, शिवानी वाघ यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…

सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा…

आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…

लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्…

युवतीशी चॅटींग आणि गोड बोलण्याला भुलला युवक अन् पुढे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!