
एटीएम कार्ड बदलून खात्यातून पैसे काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना अटक…
घाटंजी (यवतमाळ) : दारव्हा येथे एटीएम कार्ड बदलून खात्यातून पैसे काढून घेण्या-या आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, ६ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दारव्हा तालुक्यातील हरु येथील फिर्यादी तुळशीराम गावंडे यांनी दारव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, फिर्यादी हा २५ जानेवारी २०२५ रोजी त्याचे खात्यातून पैसे काढण्यासाठी दारव्हा येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये गेले असता, तेथे पैसे काढत असताना एक दोन वेळा प्रयत्न करूनही एटीएम कार्ड काम करत नव्हते. त्याचे जवळ उभा असलेला अनोळखी व्यक्ती पाहत होता. त्याच वेळी अज्ञाताने एटीएम मधून पैसे काढण्याची प्रक्रिया सांगितली. एटीएम कार्ड साथ देत नसल्याने अज्ञाताने कार्डची हेरा फेरी करुन एटीएम कार्ड बदलून दुसरे एटीएम कार्ड फिर्यादी तुळशीराम गावंडे यास परत दिले. तसेच विविध ठिकाणावरुन त्याचे खात्यातून १ लाख १५ रुपये काढल्याचे लक्षात आले. फिर्यादी तुळशीराम गावंडे यांनी दारव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रं. ५९/२०२५ अंतर्गत कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच अवधुतवाडी पोलिस ठाण्यात अशाच प्रकारे गुन्हा केल्याने अपराध क्रं. ११०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) अंतर्गत दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला.
विशेष म्हणजे दोन्ही गुन्ह्याचा तपास करत असताना सर्व तांत्रिक बाबी पडताळल्या असता, अशा पद्धतीने गुन्हे करणारी आंध्रप्रदेश व कर्नाटक येथील आरोपींची टोळी यवतमाळ येथे आल्याचे निष्पन्न झाले. यवतमाळचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शन व सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीष चवरे व अनिधस्त पथकातील पोलिस अधिकारी आंध्रप्रदेश व कर्नाटक येथे आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले. या वेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, एस. कृष्णमुर्ती (रा. कोकंणती जि. अंतपूर) याने केए. ३२ डी. ५८८१ या वाहनाने त्याचे साथीदारांसह महाराष्ट्र व इतर राज्यात जाऊन एटीएम कार्ड बदलून पैसे काढून फसवणुकीचे गुन्हे केले आहेत. त्यावरुन मोहन्ना चिंताला (वय ३०), कृष्ण मलप्पा भिमनळीकर (वय ३०) यांची चौकशी करण्यात आली. मात्र, एस. कृष्णमुर्ती हा फरार असल्याचे सांगण्यात आले. वरील दोन्ही आरोपीकडून गुन्ह्यातील फसवणूकीची रक्कम १ लाख २० हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन केए. ३२ डी. ५८८१ अंदाजे किंमत ५ लाख रुपये व मोबाईल ५००० असा एकूण ६ लाख २५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी क्रंमाक २ व ३ यांनी अशा प्रकारे नागपूर व इतर ठिकाणी गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.
सदरची कारवाई यवतमाळ पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, LCB चे पोलिस निरीक्षक सतिष चवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय महाले, पोलिस अंमलदार बबलु चव्हाण, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, जितेंद्र चौधरी व अमित कुमरे आणि सायबर सेलचे प्रणय ईटकर, प्रगती कांबळे, रोशनी जोगडेकर आदींनी यशस्वी रित्या पार पाडली.
ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…
डिजिटल अरेस्टसाठी तोतया पोलिस अधिकाऱ्याचा VIDEO कॉल अन् युवकाची शक्कल…
धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…
Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…
नवरदेवाने इन्स्टन्ट लोन कंपनीकडून पैसे घेतले पण एजंट्सनी पत्नीचे फोटो केले मॉर्फ अन्…
Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…
एकाला तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा; कसा पाहा…
पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…
Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…
Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…
पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…
आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…
युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…
सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…
महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

