ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…

मुंबई : भिवंडी शहरातील शांतीनगर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या तीन जणांना अटक केली असून त्यांच्या जवळून 9 मोबाईल,12 डेबिट कार्ड,17 चेक बुक असा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फातिमा नगर येथे काही व्यक्ती वेगवेगळ्या लोकांच्या नावाने बँक खाते उघडून ऑनलाइन फसवणूक करून त्यांचे बँक खात्यात पैसे आल्यानंतर पैसे काढून लोकांचे फसवणूक करत होते. या बाबतची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने फातिमानगर परिसरातून अब्दुल रब अब्दुल अहाद अन्सारी ( वय 23), आतिक अहमद अन्सारी (वय 20), मोहम्मद बशर जकी उल्ला अन्सारी (20) यांसह दोन अल्पवयीन अशा पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडील बँक खात्याची माहिती राष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग पोर्टल तपासणी केली.

आरोपींकडून हस्तगत केलेल्या बँक खात्यात भारतातील वेगवेगळ्या शहरामधील, देहेरी पोलीस स्टेशन बिहार राज्य, तामिळनाडू कोईमतुर, तामिळनाडू, भिवडी पोलीस स्टेशन राजस्थान, नारायणपुरा पोलीस स्टेशन अहमदाबाद, हिन्नूर पोलीस स्टेशन बेंगलोर, कर्नाटक या ठिकाणाहून त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर झाल्याने बँक खाते फ्रीज करण्यात आल्याची माहिती मिळाली.

ताब्यात घेतलेले ऑनलाइन फसवणूक करणारे असल्याची खात्री झाल्याने त्यांच्या जवळील आठ बँक खात्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार आरोपींच्या बँक खात्यांमध्ये सुमारे 35 लाख रुपये रक्कम वर्ग झाली व त्यानंतर आरोपींनी ही रक्कम तत्काळ बँक खात्यातून काढून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या पाच आरोपींविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघा जणांना अटक केली आहे. आरोपींजवळील उर्वरित बँक खात्याची तपासणी करून फसवणूक केलेली रक्कम अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.

डिजिटल अरेस्टसाठी तोतया पोलिस अधिकाऱ्याचा VIDEO कॉल अन् युवकाची शक्कल…

धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…

Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…

नवरदेवाने इन्स्टन्ट लोन कंपनीकडून पैसे घेतले पण एजंट्सनी पत्नीचे फोटो केले मॉर्फ अन्…

Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

एकाला तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा; कसा पाहा…

पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…

Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…

Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…

पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…

आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…

युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…

सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…

महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!