एकाला तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा; कसा पाहा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर (जि. पुणे) शहरातील एका नोकरदाराला वेगवेगळी कारणे देऊन हे बँक अकाउंट आरबीआय अकाउंट अॅड होत असून तुमचे अकाउंटचे सर्व पैसे ट्रान्सफर करून व्हेरीफिकेशन झाल्यानंतर परत तुमचे पैसे परत तुमच्या अकाउंटला जमा होतील असे सांगून तब्बल एकुण ८४ लाख ३४ हजाराला गंडा घालण्यात आला आहे.

प्रकाश विनायक धामणकर (वय 43 वर्षे, रा. बागवान नगर, शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे, मुळ रा. चिंचाळा एम.आय.डी.सी ता. जि चंद्रपुर) यांच्या तक्रारीवरून अज्ञात विरोधात शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर क्राईम चोरट्याने वेगवेगळी कारणे देऊन वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेण्यात आले आहे. आय.डी.बी.आय बँकेवरून आय या बँक अॅप मध्ये २० लाख AMAN KUMAR या आय.डी. वर ट्रान्सफर केले. त्यानंतर फायनल स्टेप ऑफ व्हिरेफिकेशन या नावने MANPURIA AGRO P या आय. डी. वर ११ लाख ७० हजार ट्रान्सेंर केले. पुढे सायबर क्राईम चोरट्याने सांगितले डी.सी.पी. साहेब यांनी सांगितले आहे की, म्युचल व शेअर्स मध्ये पैसे असल्याने तुमचे व्हिरीफिकेशन पूर्ण होत नाही. त्यांनतर त्यांना म्युचल फंड व शेअर्स मार्केटचे शेअर्स विकण्यास सांगितले. म्युच्युअल फंड मधील पैसे काढले व शेअर्स मार्केटचे शेअर्स विकून ३९ लाख ८४ हजार ऐवढे आय. सी. आय सी.आय बँकेत घेतले. त्यानंतर अपेक्षा हॉस्पिटल या आय.डी. वर २० लाख रुपये, तसेच LLTAJ Rali या आय. डी. वर ६ लाख ८४ हजार, तसेच MAHENDRA BISHNO या अंकाउंटवर १० लाख रुपये, DHIRENDRA/YESB0000263 या आय.डी. वर ३ लाख ट्रान्सफर करून घेतले.

त्यांनतर त्यांनी सांगितले की, तुमचे आज शेवटचे व्हिरीफिकेशन आहे. पर्सनल लोन काढावे लागेल असे सांगितले व तुम्ही पर्सनल लोनकरीता अॅप्लीकेशन करा असे सांगितल्याने ऑनलाईन नंतर पर्सनल लोन आय.सी. आय बँकेने लोन १२ लाख मंजुर केले व PANGYA digit या आयडीवर ११ लाख ८० हजार ट्रान्सफर करुन घेतले. तसेच pandya digit या आयडीवर १ लाख रुपये असे वेगवेगळ्या अकाउंट वरुन तब्बल 84 लाख 34 हजार रुपये पाठविण्यास सांगुन ऑनलाईन फसवणुक करण्यात आली. अशी फिर्याद प्रकाश विनायक धामणकर यांनी शिरूर पोलिस स्टेशनला दिली. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…

Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…

Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…

पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…

आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…

युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…

सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…

महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीला कॉल आला अन् गमावले २० लाख…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!