
सतीश भोसले उर्फ खोक्याला कोठडीत मारहाण; पाठीवर मारहाणीचे व्रण…
बीड: शिकारीचे साहित्य आणि घरात आढळलेल्या मांस प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्या याला वनविभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा वकिलाने दावा केला आहे. वकिलाने केलेल्या दाव्यानंतर खोक्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सतीश भोसले याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सतीश भोसलेच्या पाठीवर वळ असल्याचे दिसून येत आहेत.
सतीश भोसले उर्फ खोक्या याला वन विभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती त्याच्या वकिलाने दिली. खोक्याला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली. न्यायालयाने वकिलाची ही मागणी मान्य करतानात सतीश भोसले याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पण वन विभागाच्या कोठडीत असताना खोक्याला नेमकी कोणी मारहाण केली, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, सतीश भोसले उर्फ खोक्याने शेकडो वन्य जीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. तसेच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा दावा शिरूर परिसरातील वन्यजीवप्रेमी माऊली शिरसाट यांनी केला आहे. परिसरात शेकडा हरणांचा वावर असताना ही हरणं कुठे गेली? ती हरणं यांच्या पोटात गेले की काय? असा माझा संशय आहे. सतीश भोसले आणि त्याची संपूर्ण टोळी हरणांची तस्करी करून त्याचा पैसा जमा करत असल्याने कदाचित त्यांच्याकडे सोनं, आलिशान गाड्या असू शकतात, अशी शंका देखील माऊली शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे.
खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणं पोलिस कर्मचाऱ्यांना भोवलं; तडकाफडकी निलंबन…
खोक्याचे घर जाळलं; प्राण्यांचा मृत्यू तर कुटुंबीयांना मारहाण झाल्याचा आरोप…
खोक्या सापडला! प्रयागराजमधून सतीश भोसले याला पोलिसांनी केली अटक…
धक्कादायक Video: लातूरमध्ये युवकाला नग्न करून बेदम मारहाण…
खोक्या भाईने पैसे उधळल्यानंतर काय दिलं उत्तर पाहाच…
बीडमध्ये अमानुष मारहाण! ‘खोक्या’ आला समोर अन् सांगितलं…
संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…
वाल्मिक कराड याचा PSI सोबतचा फोन व्हायरल; मी बीड जिल्ह्याचा बाप…
बीड पोलिसांची आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई…
बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…

