Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…
नवी दिल्लीः लग्नाची निमंत्रण पत्रिका व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेकजण पाठवतात. यामुळे कार्ड बनवण्याचा खर्चही वाचतो आणि वेळही वाजतो. पण, सायबर गुन्हेगारांनी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेद्वारे फसवणुकीची नवीन पद्धत शोधून काढली आहे.
लग्नाची एक चुकीची निमंत्रण पत्रिका तुमच्या फोनमधील संपूर्ण डाटा उडवू शकते. तसेच अज्ञात नंबरवरुन एक मेसेज येतो आणि त्यात वेडिंग इन्विटेशन (लग्नाचे निमंत्रण) असे लिहिलेले असते. ही पत्रिका मोबाईलमध्ये डाऊनलोड करताच फोनमधील संपूर्ण डाटा सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे या संदर्भात पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.
सायबर गुन्हेगार हे तुमच्या मोबाईलवर बनावट लग्नाचे निमंत्रणाच्या नावाने एक APK फाइल व्हॉट्सअपवर पाठवतात. याला डाऊनलोड केल्यावर मोबाईलमध्ये एक अॅप्लिकेशन डाऊनलोड होते आणि यामुळे फोन हॅक होतो. यामुळे सायबर गुन्हेगार तुमचा फोनच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला तुमच्या माहितीविना मेसेज पाठवू शकतात आणि पैशांची मागणी करू शकतात. त्यामुळे कोणत्याही अज्ञात फोन नंबरवरुन येणाऱ्या मेसेजपासून सुरक्षित राहायला हवे. अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही प्रकारची फाईल डाउनलोड करू नये.
व्हॉट्सअपवर येणारी कोणताही फाईल डाउनलोड करण्याआधी तपासायला हवी. जर APK फाइल असेल तर ती फाईल डाऊनलोड करू नये. याशिवाय ओळख क्रमांकावरून येणाऱ्या इतर फायलीही नीट तपासल्यावरच डाउनलोड कराव्यात, असे सायबर पोलिसांनी सांगितले आहे.
Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…
पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…
आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…
युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…
सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…
महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…
भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीला कॉल आला अन् गमावले २० लाख…