
युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…
पुणे : सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगून मनी लाँड्रिंग प्रकरणातील नरेश गोयल गुन्ह्यात सहभाग असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका युवतीची दोन लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. संबंधित प्रकार 7 मे 2024 ते 19 जून 2024 या कालावधीत घडला आहे.
मगरपट्टा येथे राहणाऱ्या युवतीने (वय २६) बुधवारी (ता.19) हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याविरुद्ध आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने फिर्यादी युवतीशी संपर्क करुन टेलीकॉम विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या मोबाईल क्रमांकावर अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली आहे. तुमचा नंबर बंद होणार असल्याचे सांगून तपास अधिकारी फोनवर बोलतील असे सांगितले.
त्यानंतर व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल द्वारे प्रदिप सावंत व राजेश मिश्रा हे सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचा आधार कार्ड क्रमांकावरुन तुम्ही नरेश गोयल (जेट एअरवेजचे संस्थापक, यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे) यांच्याशी संबंधित गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तुम्हाला यातून वाचाचे असेल तर हिमांशु मार्केटींग च्या नावावर असलेल्या बँक खात्यावर 2 लाख 20 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानुसार तरुणीने पैसे पाठवले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर युवतीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास पोलिस निरीक्षक गुन्हे उमेश गित्ते करीत आहेत.
‘कॉल गर्ल’च्या नावाने फोन करून युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बेड्या…
भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीला कॉल आला अन् गमावले २० लाख…
पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाला नेहाने घातला गंडा…
IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…
आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…
महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…
सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा…
युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

