Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

मुंबई: बोरिवली परिसरात राहणाऱ्या आणि फार्मा कंपनीत काम करणाऱ्या युवती सोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवतीचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आले असून नरेश गोयल प्रकरणाशी असल्याचे सांगून सीबीआयच्या तोतया अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये अंगझडतीच्या नावाखाली अंधेरी येथील युवतीला (वय २०) विवस्त्र होण्यास भाग पाडून चित्रीकरण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

युवतीला तपासात तातडीने सहकार्य करावे, अन्यथा अटक करू, अशी धमकी देत व्हिडिओ कॉलवर तिचे कपडे काढण्यास भाग पाडले आहे. त्यानंतर तिचे चित्रीकरण करुन हा व्हिडिओ संपर्कातील नागरिकांमध्ये व्हायरल करण्यात आला आहे. त्यानंतर अटक आणि बदनामीची भीती दाखवत तिच्याकडून सुमारे 2 लाख रुपये उकळण्यात आले आहेत. याप्रकरणी युवतीने दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. युवतीच्या तक्रारीच्या अनुषंगाने दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अंधेरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडल्यामुळं दहिसर पोलिसांनी अंधेरी पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, देशात दररोज शेकडो लोक सायबर फसवणुकीचे बळी ठरतात. डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणुकीची प्रकरणे प्रत्येक शहरातून वाढत आहेत. लोकांना यापासून सावध राहणे गरजेचे आहे. फसवणुकीचे हे प्रकार लोकांना माहित नसल्याने ते याला बळी पडतात. सायबर चोरांनी आतापर्यंत अनेक लोकांना गंडा घातला आहे.

एकाला तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा; कसा पाहा…

पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…

Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…

Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…

पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…

आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…

युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…

सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…

महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीला कॉल आला अन् गमावले २० लाख…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!